Welcome to misalpav.com

स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:
आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो. ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही. म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी: "स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।" स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया!


संघर्ष

लेखक: आकाश खोत | प्रसिद्ध:
नुकतीच अमिताभ बच्चन यांची एक सुंदर मुलाखत पाहण्यात आली. चक्क अर्णब गोस्वामीने अमिताभना या मुलाखतीत बोलू दिलं. :D या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचे वडील (महान साहित्यिक) हरिवंशराय बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. एकदा अमिताभ काही समस्यांमुळे त्रस्त होऊन वडिलांकडे गेले. आणि त्यांना तक्रारीच्या सुरात म्हणाले, "बाबूजी, जीवनमे बडा संघर्ष है" त्यावर हरिवंशराय यांनी उत्तर दिले "जब तक जीवन है, तब तक संघर्ष है". अगदी सहज त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिलं. संघर्ष हा जीवनातला एक त्रासदायक टप्पा नसून आयुष्यभर असणार याची जाणीव करून दिली. आपल्याला नेहमी भरपूर अडचणी येत राहतात.


साईझ मॅटर्स

लेखक: पॉइंट ब्लँक | प्रसिद्ध:
डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो. असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता.


ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता.


सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान

लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे.


गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
मागिल भाग.. आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो. मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर??? पुढे चालू... ================================ त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती.


कथा-कॉलेज कट्टा भाग ४

लेखक: चेतन677 | प्रसिद्ध:
मागील भाग...... कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 कथा-कॉलेज कट्टा भाग 3 वैष्णवी अभि शेजारी बसली.थोडा वेळ झाला मधेच नकळतपणे अभिचा हात वैष्णवीच्या हाताला लागला. " ओह सॉरी..." असं म्हणत अभि जरा बाजुला सरकला. त्यावर वैष्णवी गालातच हसली.कदाचित अभि हा खुपच लाजरा मुलगा आहे असे तिला वाटत होते. " हाय....वैष्णवी...काय गं ही काय वेळ आहे काय कॉलेजचा आज शेवटचा दिवस आणि तु आज चक्क कॉलेजला??


गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय. आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.


ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे

लेखक: अन्या दातार | प्रसिद्ध:
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय! वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात. poster कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.


वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४

लेखक: श्रीरंग_जोशी | प्रसिद्ध:
यापूर्वीचे भाग - , , व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.