Welcome to misalpav.com

अक्कल दाढ ????

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो.


शेतातला एक दिवस...

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
'संसदेतला एक दिवस ' ह्या माझ्या आधीच्या लिखाणाचा दुसरा भाग म्हणून हा कल्पनाविस्तार प्रकाशित करत आहे. आधीच्या भागाचा दुवा खाली दिलेला आहे. http://www.misalpav.com/node/31437 युवराजांनी आता मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी जनतेतली आपली प्रतिमा सुधारायची. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा.ते प्रश्न सोडवून जनतेचा हिरो बनायचं. पण त्यांना नक्की सुरवात कोठून करावी हे कळत नव्हतं. या विचारात असतानाच कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की , भारत हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान आणि कृषीप्रधान ह्या दोन शब्दात त्यांना काहीतरी साम्य जाणवल्यामुळे त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.


सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

लेखक: ganeshpavale | प्रसिद्ध:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.



स्वस्तिक ३ अंतिम भाग

लेखक: शब्दानुज | प्रसिद्ध:
पुर्वाध - स्वस्तिककडुन सापडलेल्या अोल्या चिठ्ठीवर मला माझ्याच विरहाचा कविता दिसतात. हेच स्वस्तिकला विचारल्यावर त्याकडुन यास अमान्यता. पुण्यालत्या पावसामुळे कागद ओले झाल्याचे म्हणणे. --------------------------------------- दुसर्या दिवशी माझ्या पुण्याच्या मावसभावाचा वाढदिवस होता.सकाळीच मावशिला मी फोन लावला. बाहेर बघितले तर पाऊस चालू झाला होता. "काय ग तिकडे काल खुप पाऊस झाला का? इथेही आत्ता चालु झाला आहे" " पाऊस ? कसाच काय! इकडे आठवडा झाला आभाळ कोरडेच आहे." त्याच क्षणी चिठ्ठी कशामुळे भिजली हे मला कळाले. थोड्यावेळाने कॉलेजला गेलो.


अंधार क्षण भाग ५ - जॅक्स लेराॅय (लेख २७)

लेखक: बोका-ए-आझम | प्रसिद्ध:
अंधार क्षण - जॅक्स लेराॅय (लेख २७) आज जेव्हा नाझींचं चित्रण केलं जातं - टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये - तेव्हा नाझीवादाचा संबंध फक्त जर्मनीशी जोडला जातो. नाझीवादाने जर्मनीबाहेरच्या अनेक लोकांवर भुरळ टाकली होती हे सोयिस्करपणे विसरलं जातं. अगदी ब्रिटन आणि अमेरिकेतही नाझीवादाचे आणि फॅसिझमचे चाहते होते. ब्रिटनमध्ये सर ओस्वाल्ड मोस्ले आणि स्वीडनमध्ये पेअर एन्गडाल यांनी फॅसिस्ट संघटना स्थापन केल्या होत्या आणि या संघटनांना चांगला लोकाश्रय लाभला होता. नाझींमध्येही सर्वचजण कट्टर होते असं म्हणता येणार नाही. हिटलरलाही याची कल्पना होती.


मुर्दाड

लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
गोव्याला असताना १९९९ - २००० जीवंती रुग्णालयात( वास्को येथील) तिथला एम टी(mechanized transport) अधिकारी म्हणून डॉक्टरी शिवाय अतिरिक्त काम माझ्या गळ्यात आले होते. यात रुग्णवाहिका त्यांचे चालक, त्यांचे तेलपाणी डागडुजी इ. सर्व कारभार पाहावा लागतो. सर्वात कटकटीचे काम म्हणजे रुग्णवाहिकेचे चालक(हे सिव्हिलियन असतात). माणूस एकदा चालक म्हणून सरकारी नोकरीत लागला कि त्याला आयुष्यभर बढती नाही. सरकारी नोकरी असल्याने कामावरून काढता येत नाही. त्यामुळे हे लोक बर्याच वेळेस माजोरी असतात.


स्वस्तिक २

लेखक: शब्दानुज | प्रसिद्ध:
पुर्वाध- स्वतिक ,माझा एक मित्र घरी भांडुन घर सोडुन जातो. रात्र्ी स्वताःच पुन्हा पुण्याहुन परततो. मी त्याच्या खिशातुन एक चिठठी हस्तगत करतो ज्यावर माझे नाव असते. -------------------------------------- ती चिठ्ठी अोलसर झालेली होती. त्यामुळेच मला माझ्या नावाची अक्षरे वाचता आली होती. आता सगळ्यांसमोर ती उघडुन वाचत बसलो असतो तर अनर्थ झाला असता. मी ती चिठ्ठी हळुच खिशात ठेवली. स्वस्तिकची आई थोड्यावेळाने बाहेर आली. रडुन रडुन त्या माऊलीने डोळे सुजवुन घेतले होते. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावले. या एवढ्या घोर प्रसंगातही त्यांनी जेवण बनवले होते अगदी स्वस्तिकच्या नावाचेही!


ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

लेखक: सर्वसाक्षी | प्रसिद्ध:
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे.


उर्जा घड्याळ

लेखक: खेडूत | प्रसिद्ध:
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.