Welcome to misalpav.com

(चार दिवस मिळाले असता )

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?


काय करावे

लेखक: श्रीकृष्ण सामंत | प्रसिद्ध:
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे


सुंदर गीते ही स्मरणात येती

लेखक: श्रीकृष्ण सामंत | प्रसिद्ध:
अवकाश आहे म्हणून बसता जुन्या गोष्टी स्मरणात येती कधी सत्याची,कधी असत्याची सुंदर गीते ही स्मरणात येती शताब्दी एकवीसावी अन् समय नवे प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई