Welcome to misalpav.com

इच्छापत्र

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.


मं...(मग)!

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
मं ..(मग?) मsssग कधीतरी 'रे' ची वाट बघून बघून थकलेल्या 'गं' चा स्वर चढतो. "मीच नेहमी हाक मारायची, मीच भेटायची बोलायची धडपड करायची, तुला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल" या "मीचमी"च्या मुद्दूसूद भांडणात मग हळूच डोकावतो तो मं.. "राग येणार नाहीतर काय, मं(मग)? मुद्दामहून करतो का रे? मं(मग)?" हा मं एकटा नसतो, मागून त्याच्या ग असला तरी अध्याहृत, कळत नकळतसा.


रे.....!

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
रे!! रे तसा रोजच असतो सभोवताली पण कधीतरी अचानक गवसतो. आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो. रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच. म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा. भूत भविष्याचं ओझं न वाहणारा, मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे! कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा , कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे! पण रे ला पहायचं ते गं सोबत! एका रे ची तिथं किती ती रुपं! गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे! गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!


गं...!

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू.. थोडासा सरळ, थोडासा वळणदार..