Welcome to misalpav.com

तटबंदी

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ओतप्रोत जे असे सांग ते का न तुला दिसतसे? त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी अमित असे जे वसे सांग ते का न तुला दिसतसे? धन-ऋण एकाकार होती त्या- -स्थळी शून्य जे वसे सांग त्या अभाव मानू कसे? जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?


तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे

लेखक: वामन देशमुख | प्रसिद्ध:
तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे
नमस्कार मिपाखरांनो! महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे ही पाककृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा.


मनोरथाच्या वाटेवर जरी

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन गळाभेट घेईन तयाची - त्यात विरुन जाईन मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे