Welcome to misalpav.com

पूणे ससून

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
इथं तीन लाख, मिळतात बसून। हो हे आहे, पुण्याचे ससून।। कसे बदलणार, डाॅक्टरचे रक्त? कुठे मिळणार, 'भ' विटामीन-रहीत शुद्ध रक्त?! कुणाकुणाचे बदलणार रक्त? पोलीस,RTO, वकील,कस्टम,Excise, जज,आमदार,बिल्डर? त्यापेक्षा सोपी, मजूरी सक्त ।।


नाळ

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
प्रश्न सुटता सुटता माय उत्तरांची व्याली प्रसवल्या उत्तरांच्या प्रश्नचिन्ह शोभे भाळी ललाटीचे लेकरांच्या वाचुनिया फुंदे माय, "प्रश्न घेऊनी जन्मल्या उत्तरांचे करू काय?" प्रश्नांकित उत्तरांची गाठ घडोघडी पडे एक सोडविण्याआधी नवा प्रश्न ठाके पुढे अनादि नि अनंत ही श्रेढी प्रश्न उत्तरांची चिरंतनाशी जोडीते नाळ क्षणभंगुराची