Welcome to misalpav.com

....किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले....(प्रौढांसाठी :) )

लेखक: कानडाऊ योगेशु | प्रसिद्ध:
कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी.. ============================================================= किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले.. पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात. केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत.. कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले... पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात.. विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात.. इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले... पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे.. उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले ता


दुधी भोपळ्याचे भरीत

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
Q एक मुलगी भरीतप्रेमी.. पहिल्यांदाच दुधी भोपळ्याचे भरीत केलं , भोपळा गॅसवर भाजल्यावर मिक्सरमधून गरगट्ट केला आणि चिरलेल्या टोमॅटो फोडणीत,तिखट- मीठ घालून परतून घेतल.मुलीला नाश्ताला दिले.भोपळ्याला नाक मुरडणारी परत परत मागून हे भोपळा भरीत खात होती..बरोबरीला भरताच्या वांग्याचं भरीत आहेच .चुटुकदार डाळिंब दाणे बरोबर. अशाच पद्धतीने पडवळ,दोडके,घोसाळ्याचे भरीत करून लहान मुलांना चटकदार पर्याय देऊ शकतो.


हाक

लेखक: चांदणशेला | प्रसिद्ध:
रानात आली कुणाची हाक डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक वळूनी बघता दिसे न कोणी पाखरांच्या मुखी आली कशी गाणी कसा होतो कळेना हा भास प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस दूर-दूर मी भांबावूनी पाहते नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते आला शिवारी दरवळत रानगंध वेडावले मी झाली ही काया धुंद


कावळ्यांची फिर्याद -२

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
कावळ्यांची फिर्याद पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा.... चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा. संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला.... पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला. कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ? क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला. लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....