Welcome to misalpav.com

योद्धा

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश


(वास्तव किचन)

लेखक: अहिरावण | प्रसिद्ध:
प्रेरणा - सर्वज्ञात चालु होते माझे रोजचेच काम रोजचाच घाम गॅसपाशी एकीकडे होते तांदुळ शिजत दुधही तापत दुजीकडे लाटून कणिक पोळ्या मऊसुत गंध सुगंधित खरपुस इतक्यात येई सख्याची ती साद भलतीच याद भलत्या वेळी काय करावे ते सुचेना काहीच भर दुपारीच चांदणे ते मोहरले मीही काम बंद केले हात ही पुसले पदराला जवळ येऊनी सख्या साजणाने ओढले हाताने अलगद दुपारची वेळ करुया साजरी कशाला लाजरी होत आहेस इतक्यात काय झाले ते कळेना आशंकीत मना भिती दाटे चल हो तु पुढे येते मी मागुनी थोडे आवरुनी पटकन वेळ नको लाऊ सखा आर्जवित गेला बिछान्यात आतुरतेने मनीची भिती खरी ठरली ती आपदा भलती भलत्या वेळी शय्यागृही जात स