Welcome to misalpav.com

श्रीगणेश लेखमाला २०२३ - पुथारेकुलू (పూతరేకులు)

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
काही नाती अशी असतात की ती कितीही जुनी झाली तरी नि:स्वार्थी, प्रेमळ, मन प्रसन्न, ताजीतवानी ठेवणारी. असेच एक नाते, ते म्हणजे बायकोची बहीण. या नात्याबद्दल काय सांगायचे.. बायको या फ्रंटवर लढण्यासाठी असलेला एकमेव मित्रपक्ष. तर सांगायचे प्रयोजन असे की आग्रहाचे निमंत्रण पेंडिंग होते. बरेच दिवस झाले जायचा योग येत नव्हता. पण म्हणतात ना, किस्मत से जादा और समय से पहले कुछ भी नही मिलताl शेवटी एकदाचा योग आला. पुणे-हैदराबाद शताब्दीचे तिकीट आरक्षित झाले. खरे तर मला चारचाकीने जायचे होते, बर्‍याच दिवसांत चारचाकीने दूरचा प्रवास केला नव्हता. पण घरातील सर्वानी मला 'म्हातारे झालात' म्हणून गप्प केले.


श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता

लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
मिपावरील माझ्या सर्व मित्रंना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती हे बुद्धीचे दैवत. याचा दैवताच्या क्षेत्रात होणाऱ्या एका क्रांतिकारक बदलाची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. याबद्दल अनेकांनी याआधीही वाचन केले असेलच, याची मला खातरी आहे. पण तरीसुद्धा या नव्या क्षेत्राची अगदी बाळबोध ओळख करून द्यायचा माझा हा एक लंगडा प्रयत्न. २१वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे - म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स भविष्यामध्ये अनेक क्षेत्रे काबीज करू शकते.


श्रीगणेश लेखमाला २०२३ - पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती

लेखक: MipaPremiYogesh | प्रसिद्ध:
पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती नवीन कॅमेरा आणि लेन्स घेतल्याने उत्साह एकदम दणदणीत होता, त्यामुळे कुठेतरी ट्रिपला जायचं आयोजन चाललं होतं. त्याच वेळेस एका मित्राने विचारलं की “आम्ही ताल छापर या ठिकाणी जाणार आहोत, तुला यायचंय का?” मग काय, बायकोची परवानगी घेतली, बायकोसुद्धा डीडीएलजेसारखं ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ या प्रकारे म्हणाली की “जा, जाऊन ये. त्या निमित्ताने नवीन कॅमेराही वापरता येईल.” तर अशा प्रकारे परवानगी मिळाली आणि मी तिकीट काढायला सुरुवात केली. पुण्यातून तिकीट खूप महाग होतं, म्हणून आम्ही मुंबईहून तिकीट काढलं - मुंबई ते जयपूर.


श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
एखाद्या झोपलेल्या मराठी माणसाच्या कानावर जरी हे शब्द पडले तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्याचे भाव उमटतील आणि मनःचक्षूंसमोर 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटातील 'धनंजय माने' नामक भाडेकरू त्याची नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा प्रसंग उभा राहील ह्यात तिळमात्र शंका नाही! २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले 'सोनेरी पान' असा लौकिक प्राप्त झालेलया 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटाला आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.