Welcome to misalpav.com

दिवाळी अंक २०२३ - आवाहन

लेखक: तुषार काळभोर | प्रसिद्ध:
राम राम, मिपाकर. गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो. मराठी अंकांची परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली नाही, माध्यमांचे बदललेले स्वरुप त्यात चढ उतार असतात पण दिवाळी अंकाचा उत्साह तसाच असतो, हे नमुद करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या लेखांना अर्थात गलेमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


(कावळ्यांची फिर्याद-३)

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२ मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते उडत,काही,पडत काही,तर काही, "नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळाची खीरं आम्हांला पण मन आहे,आम्हींतरी कुठवरं धरावा धीर तीच ती रव्याची पोळी,आताशा,पितरं सुद्धा त्रास