पहिल्या मेन्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर,आठवड्याचे मेन्यू सादर करावे म्हणून सजग झाले.भूक ही पोळी ,भाजी इ.खाण्याची नसते तर जास्त प्रमाणात प्रोटीन,मिनरल, व्हिटॅमिन आणि आवश्यक फैट,कार्ब मिळवण्यासाठी असते.पूर्वापार मनुष्य मांसाहारी होता पण आता काही काळापासूनच तो शाकाहारी झाला आहे.तेव्हा शरीराला आधी प्रोटीनच आकर्षित करते.शाकाहारींनी डाळीचे प्रमाण अधिक ठेवावे.मिनरल आणि व्हिटॅमिनसाठी हिरव्या भाज्या ,फळ यांचे अधिक प्रमाण असावे.तसेच प्रोबायोटिक दही , प्रिबायोटिक फायबर युक्त सेलैड यांचा समावेश.आयर्नसाठी कधी गूळ तीळ-शेंगादाणा लाडू,खजूर, राजगिरा गूळ लाडू,मिलेट-गूळ लाडू यांचा समावेश असावा.
