Welcome to misalpav.com

पावसाचं वय....

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दू


झटपट कप केक्स

लेखक: नागनिका | प्रसिद्ध:
साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट . कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा.


शपथ

लेखक: मी-दिपाली | प्रसिद्ध:
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥ सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥ एक सूर... द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥ एक सूर... स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥ एक सूर... वासना विकार मीपणा समूळ तो गळो माणसास माणसातलाच देव आकळो देहमंदिरात हाच मंत्रघोष जागवू ॥४॥ एक सूर... (वृत्त - देवराज) १५.८.२०२३