जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली
- Read more about जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1515 views
https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-meeting-with-entrepreneur-a-a719/
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली,
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
दूरातल्या चॅनल चे पापाराझी मांडलेले,
भिंगात कॅमेराचे ब्रेकींगन्यूज सांडलेले
कैफात ही युतीची अन् पालखी निघाली
केस मधल्या जरंडेश्वर कारखान्यास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी युती मिळाली
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली,
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात *शरदचंद्र* होता, स्पर्शात लाख नारे
ओथंबला शाहू-फुल्यांनी अवकाश