Welcome to misalpav.com

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात.


ओपनहायमर नोलन‌ कलाकृती

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
D यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी. अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे.


कळा ज्या लागल्या जीवा...

लेखक: मी-दिपाली | प्रसिद्ध:
IMG-20230722-102149 ही पोट्टी मी तिच्याबरोबर केलेल्या गोष्टींचं उट्टं भरून काढायला लागलीये. मलाच अवदसा आठवली आणि 'दुखतंय का' असं प्राकृत भाषेत विचारण्याऐवजी शुद्ध मराठीत विचारलं, “ पेन होतंय का ?


कर जरा कंट्रोल...! :-)

लेखक: चलत मुसाफिर | प्रसिद्ध:
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला? शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम बिघडले कोठे


स्वप्नजा!

लेखक: राघव | प्रसिद्ध:
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-) कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक! चालुनी येते खरी आहेस का? राग छेडी तार हृदयाचीच माझ्या.. अजुनी तू "रागा"वली आहेस का? काल मज दिसलीस तू होती म्हणूनी.. आज वाटे, तू उद्या आहेस का? --- का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर? सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का? राघव [१९ जुलै २३]


जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.


चीझी पालक मका

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
A पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही. मका होता पालक होता.न उकळता फक्त पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली. साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ, एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुस


हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivpuri-rad88 या बातमीवर कविता (कुसुमाग्रजांची क्षमा मागून) हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! नांदण्याचे निरोप माझ्या प्रियकराला पोचवा ॥ वाट एकाकी प्रेमाची, हरवलेल्या बाईमाणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा ॥