Welcome to misalpav.com

रानभाजी - आघाडा

लेखक: आलो आलो | प्रसिद्ध:
रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या. हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली. आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो.


वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ इसरोच्या वैज्ञानिकांनी तिरुपति येथे जाऊन भगवंताचे आशीर्वाद चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी घेतले. ते वैज्ञानिक होते, तरीही त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले ही बातमी वाचल्यावर अनेक अतिविद्वान लोकांच्या पोटात दुखू लागले। स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या अतिविद्वानांनी सोशल मीडियावर देशाचा मान सम्मान वाढविणार्‍या वैज्ञानिकांची खिल्ली उडविन्याचा दारुण प्रयास केला. "सत्यासाठी शिरले असत्याच्या गाभार्‍यात" अशाही टिप्पणी झाल्या.


पाऊस: २

लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
पाऊस: १ ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या. a


शुभ्र काही जीवघेणे...

लेखक: मी-दिपाली | प्रसिद्ध:
Indian Ghost tree वनस्पतीशास्त्र विषय पदवीसाठी निवडल्यामुळे फिल्ड ट्रिप्स, एक्सकर्शन्स या गोष्टी ओघाने त्याबरोबर आल्या. एरवी कॉलेजच्या पिकनिकला घरून परवानगी मिळणं, ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण यासाठी गुण असतात, ही सत्य परिस्थिती नेटाने घरच्यांच्या मनावर बिंबवण्यात यश आलं आणि त्यामुळे परवानगी मिळत गेली.


स्वतःचे खरे रूप .

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे .


'मलईदार खाते (!?)' वाटप

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabinet-expansion-portfolio-allocation-ajit-pawar-started-work-meeting-held-with-the-senior-officials-of-the-finance-department/articleshow/101759191.cms दादांना अर्थखाते जर फायली दिल्या तर जसे चोराहाती तिजोरी किल्या ! घरी तो आला मित्र हाडवैरी सावरण्या जुनी आपली हेराफेरी पांढरा कपड्यात जा व लूट पोलीस मारती कडक सॅल्यूट पाहीला नाही जनमत दट्ट्या लोकशाही म्हणजे नाही थट्टा!! जीवाची मात्र होते काहीली ! कुठे ठेवल्या नाना ने फाईली? तोंडात अंजिर, हातात खंजीर मी न मागेफिर येवो कोणी पीर.


हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक

लेखक: सावि | प्रसिद्ध:
"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात ! तसं आमच्या पैकी ट्रेक करणे ही काही आवड किंवा छंद नाही कोणाचाच, पण "कुछ तुफानी करते है, और कुछ अलग करते है" याच तत्वावर हिमालय च्या कुशीत कुठेतरी जायचं ठरलं.


एकटा जीव सदाशिव

लेखक: निओ | प्रसिद्ध:
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.