Welcome to misalpav.com

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-३

लेखक: भागो | प्रसिद्ध:
तो कोण आहे ह्याबद्दल त्याची स्वतःचीच खात्री नव्हती. तो जेव्हा प्रेक्षागृहातू बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. “जागा हो.” आपण कुठल्या शहरात आलो आहोत? समजायला काही मार्ग नव्हता. विचारावे का कुणाला? ऐकणाऱ्याची काय प्रतिक्रिया होईल? त्याला वेडा तर समजणार नाहीत? त्याने डोक्याला ताण देऊन आठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला? परिणाम मात्र उलटा झाला. मेंदूत जणू घणाचे घाव पडू लागले. ठण्ण्, ठण्ण्, ठण्ण्... मेंदूत आठवणीची गर्दी झाली होती.


आठ्या

लेखक: अहिरावण | प्रसिद्ध:
प्रेरणा : ओळखा पाहू कॉलेजात झब्बा, जीन्स अन कोल्हापूरी चप्पल घालून निवांत हिरवळ पहात गप्पा मारत कट्ट्यावर बसायचो ते दिवस अचानक आठवले अन चला बरेच दिवसांत कोल्हापूरी चप्पल आणली नाही म्हणुन आणावी असे ठरवतो तोच... बाबा, मला नवे बुट आणायचे आहेत पैसे द्या जरा म्हणून पोराने हुकुम सोडला च्यायला खुप दिवस झालेत रे मस्त वाईनचे घूटके घेत गप्पा मारु अन हादडू बाहेर कुठेतरी मित्राचा फोन आला तेव्हा मन हुरहुरले चालेल करुया पार्टी म्हणुन बायकोला सांगायला फोन करणार तोच तिचा फोन आला अहो ऐका ना आज लवकर घरी या मला अमुक तमुकच्या लग्नाला जायचे आहे एक पण चांगली साडी नाही नवी आणु या का?


(गोट्या)

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या


सिनेमाच्या गोष्टी भाग ६

लेखक: साहना | प्रसिद्ध:
आजचा चित्रपट एक भारतीय चित्रपट आहे आणि तो सुद्धा मिथुनदाचा. मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ अशीच इमेज आहे. गुंडा, लोहा, आणखीन अनेक बी ग्रेड सिनेमांचा सम्राट मिथुन ह्याला मुख्य चित्रपट क्षेत्रांत सुद्धा चांगले यश लाभले. मिथुन मध्ये अभिनय क्षमता होती ह्यांत शंकाच नाही. गुरु मधील रामनाथ गोयंका ह्यांची भूमिका माझी विशेष प्रिय मिथुन भूमिका आहे. मिथुन ह्यांचा गुडिया हा चित्रपट जास्त लोकांनी पहिला असेल असे मला वाटत नाही. हा १००% आर्ट सिनेमा होता. ह्याचा प्रीमिअर सुद्धा १९९७ मध्ये टीव्ही वर झाला. तेंव्हा सहारा नावाचा चॅनल होता त्याच्यावर.


(पाट्या) :/

लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | प्रसिद्ध:
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या


छाट्या

लेखक: अहिरावण | प्रसिद्ध:
प्रेरणा : ओळखा पाहू गावोगाव हिंडून दारोदार भिक्षा मागतांना कुणी दान दिलेल्या कुणी फेकून दिलेल्या कुठून कुठून मिळवलेल्या गोळा केलेल्या सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी छाट्या आज वाटून मोकळे होऊ उद्या मोकळे होऊ म्हणता म्हणता दिवस सरता सरता अजुन एक भर पडून नीट घडी करुन, जपून ट्रंकेत ठेवलेल्या याने दिलेली त्याने दिलेली अन ती छाटी तर...