Welcome to misalpav.com

बरणी..

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन.. मोठ्या हौशीने बरणी आणली आधी पत्र्याचं झाकण होतं लोणचं घातलं सतत तेलं खारं संपर्कामुळे ते झाकण गंजल... मग खुप शोधा शोध केली बोरं आळी,गंज बाजार त्याच मापाचं प्लास्टिक झाकण शोधून मिळवलं .. आता लोणचं नाही टाकलं मुरांबा केलाय आंबट गोड वेलदोडे ,लवंग स्वादाने भरलेला बरणीत मुरांबा आता चांगला मुरलाय बरणी आहे 'काचेची' कर् करून नावं कोरता येत नाही मलमलच्या कपडा तिच्या तोंडाशी बांधते ओळख म्हणून...


कुटचलनाची बाराखडी----ब्लॉक-चेन

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी माझ्या मागच्या एका लेखात कुटचलनाबद्दल थोडी माहिती दिली होती. पण कुटचलन हे ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे आले किंवा ज्यावर ते आधारित आहे , त्या ब्लॉकचेन बद्दल काही लिहायचे राहून गेले होते. ते आपण इथे पाहूया. जसे आपल्याला झेरॉक्स म्हटले की समजते पण खरेतर "फोटो कॉपियर" हे त्या तंत्राचे मूळ नाव आहे आणि झेरॉक्स ते बनवणारी एका कंपनी. तसे ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे आणि बीटकॉइन हे ब्लॉकचेनवर आधारलेले एक कुटचलन. मागच्या लेखाचा दुवा कुटचलनाची बाराखडी तर मुळात ब्लॉकचेन काय आहे ?


वाट्या..

लेखक: गवि | प्रसिद्ध:
सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं.. गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं.. बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं.. नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं.. फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या.. उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या.. पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या.. आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या.. मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या.. पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून.. त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या.. पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठासलेल्या ठरीव आकाराच्या थंड वाट्या.. कर्कश आवाजात ओरखडून तारख


कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग - १.५

लेखक: भागो | प्रसिद्ध:
स्थळ. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पण आत्ता इथे. आकाशगंगेच्या उत्तर दिशेला असलेले केंस वेनाटीकी (Canes Venatici) नक्षत्र समूहात टीओएन ६१८ अतिविशाल कृष्ण विवर. वेळ? ज्याने “काळा”ला गती दिली त्याच्याच उपस्थितीत तुम्ही वेळ विचारत आहात! कृष्ण विवरात कालप्रवाह थबकलेला असतो. पुढे जायचं विसरलेला असेल किंवा वहायची इच्छाशक्ति हरवली असेल. अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर काळ नतमस्तक झाला होता. Time saw The Mastar and froze! अशा ह्या एकलतेमध्ये अशरिणी विश्वशक्तींची विचारसभा भरली आहे.


हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-fort-darshana-pawar-murder-case-how-a-driver-daughter-became-an-mpsc-topper/articleshow/101127207.cms हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं.... कशी पडलीस आकर्षणा गं ? गाजवून एमपीएससी चमत्कारा ग, आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग जरी जाहलीस वनाधिकारी ग, नाही जाणले श्वापद विकारी ग सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग तुझी बुद्धी गेली वाया ग, गेली कूजून सुंदर काया ग राहीली महाराष्ट्र सेवा ग ! राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।


कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२

लेखक: भागो | प्रसिद्ध:
भाग -२ दुपार झाली होती. करमरकर सकाळी शास्त्रींबरोबर झालेल्या मीटिंगमुळे अस्वस्थ होते. शास्त्री काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण अनामिक भयाने पछाडल्यामुळे त्यांना बोलायचे धाडस होत नसावे. ह्या संयंत्राच्या बांधणीत असंख्य अडचणी आल्या होत्या. ही गोष्ट खरी होती, शास्त्रींनी मघा घारीचा उल्लेख केला. एका वर्षापूर्वी घारीने प्रॉजेक्टच्या स्विचआवारावर उंदीर पकडण्यासाठी झडप टाकली होती आणि शॉर्टसर्किट होऊन आरोहित्र जळाले. बीएचइएलने तत्परतेनं नवीन आरोहित्र बनवून दिले म्हणून नाहीतर? नंतरच्या धुवाधार मान्सून मध्ये संयंत्राच्या भोगद्यात पाणी शिरले होते.


पुणे ते सासवड पायी वारी

लेखक: गिरि | प्रसिद्ध:
दि १४ जून २०२३ मला लाभलेली पहिली एक दिवसीय पुणे ते सासवड अशी पायी वारी. आई ची इच्छा आणि आमच्या टीम इंडो ऍथलेटिक सोसायटी नि केलेलं आवाहन दोनी अगदी जुळून आले.


कथा सिनेमाच्या भाग ५

लेखक: साहना | प्रसिद्ध:
आजच्या लेखमालेत एक विशेष चित्रपटाची कथा आम्ही पाहणार आहोत. भारतीय चित्रपटांत अनेक वेळा चित्रपटाची नावे हि जुन्या गाण्यावरून ठेवली जातात. उदाहरणार्थ "प्रेम रतन धन पायो", "एक में और एक तू", "मेरी प्यारी बिंदू" इत्यादी. हॉलिवूड मध्ये सुद्धा हि प्रथा पाहायला मिळते. कधी कधी चित्रपट जुन्या गाण्याला लोकप्रिय करतो तर कधी उलटपक्षी होते. आजचा चित्रपट अश्याच एका गीताच्या नावावरून आहे. "स्टॅन्ड बाय मी". (चित्रपट मुद्दामहून पाहण्यासारखा आहे) चित्रपटांच्या श्रेणी असंख्य आहेत. स्त्री प्रधान, पुरुष प्रधान इत्यादी आणि त्यांत सुद्धा लहान मुले असली तर "coming of age" हि एक वेगळीच श्रेणी आहे.


भारताबाहेरचा भारत -अंदमान ३

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
आधीचे भाग भारताबाहेरचा भारत -अंदमान १ भारताबाहेरचा भारत -अंदमान २ काल संध्याकाळीच हॉटेलवर सोडताना उडता पंजाब ने सकाळी ७.३० ला तयार राहायचे फर्मान सोडले होते. कारण ८ वाजता एलिफंटा बीचवर जाण्यासाठी बोट सुटणार होती.तिकिटे तिथेच काढायची असल्याने वेळेत जाणे सोयीचे होते. त्याप्रमाणे आम्ही ७ वाजताच तयार होऊन बसलो. थोडाफार नाश्ताही करून घेतला. इकडे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळत होता.


मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे