Welcome to misalpav.com

चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

लेखक: दमामि | प्रसिद्ध:
म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला? डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||   उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी| काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक|| अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक | जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही || नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा | आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त || तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल | केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता || तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल? फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना|| सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प


Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

लेखक: अनुस्वार | प्रसिद्ध:
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.


Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

लेखक: अनिंद्य | प्रसिद्ध:
या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतारिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे.


Thought Experiment No 2

लेखक: भागो | प्रसिद्ध:
रविवारची सकाळ. साहेब आणि बाईसाहेब नाष्टा करत होते. रोबोटिक वॅक्युम क्लीनर बेडरूम झाडत होता. रात्रीची उष्टी भांडी डिशवॉशर ने रात्रीच स्वच्छ करून ठेवली होती. टोस्टरने ब्रेड भाजून ठेवले होते. कॉफी मेकरने कॉफी तयार केली होती. बाईसाहेबांनी नाश्ता मांडला होता. पण मला वाटतं दोघांचेही खाण्यात लक्ष नव्हते. एक अनामिक ताण होता दोघांच्या मनावर. शेवटी साहेबांनी शांततेचा भंग करत तो पर्यंत म्हटलं, “अनु, आता तू काय करणार?” “काय करू? तूच सांग. आज पहिलाच दिवस होता. आणि हे अस.” “तू एचआरला फोन करून रिक्वेस्ट करून बघ. अजून चार पाच दिवसांची सवड मिळाली तर. तसे चांगले आहेत ते लोक. मी करू का फोन?


पुस्तक परिचय: लॉक ग्रिफिन --लेखक -वसंत वसंत लिमये

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक हाती आले आणि अतिशय रंजक असल्याने आठवड्याभरात वाचूनही झाले. त्याचीच ही ओळख. पुस्तकाचे लेखक वसंत लिमये हे माझ्यामते काही पेशाने लेखक नव्हेत. ते आय आय टी मुंबईचे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत आणि पुण्यात हाय प्लेसेस नावाची ट्रेकिंग संदर्भातील एक कंपनी चालवतात. ताम्हिणी घाटात गरुड माची नावाची कॅम्प साईटही त्यांनी बनवली आहे जिथे कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे दिली जातात.


हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग १: सुरुवात

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणारी आमच्या कौटुंबिक हिवाळी गटाची सहल काही वैयक्तिक कारणांमुळे या वेळी लवकर घेण्यात यावी का अशी विचारणा केली होती त्यास सर्वांकडून होकार मिळाला. कॅलेंडर बघितले. दिवाळी ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात होती. सुट्यांमध्ये पर्यटन स्थळांना गर्दी असते त्यामुळे यापूर्वीच सहल घ्यायचे ठरून ऑक्टोबरचा पहिला व दुसरा आठवडा सहलीसाठी निश्चित झाला. बघता बघता सहलीसाठी सोळा जणांची नोंदणीही झाली. साधारण नऊ मुक्काम व रेल्वे प्रवासासहित बारा दिवसांची सहल करण्याचे ठरले. सहलीचा साधारण कालावधी ठरल्यानंतर सहलीस कुठे जायचे याचा विचार सुरु झाला.


Thought Experiment No 1

लेखक: भागो | प्रसिद्ध:
खयालोमे तो सगळा आठवडा आमच्या कुटुंबाला चांगला गेला होता. माझे आणि बायकोचं एकदाही भांडण झाले नव्हते. ती सात दिवस दररोज भेंडीची भाजी करत होती. भेंडी म्हटलं कि माझ्या अंगावर हे भेंडी एवढे काटे येतात पण ह्या आठवड्यात नाही. ताकातली भेंडी, भेंडी आणि ताक, भेंडीतले ताक, ताक भेंडी रस्सा, भेंडी दो ताक, भेडीया भेंडी, क्रश्ड लेडीज फिंगर ऑ बटरमिल्क असे भेंडीचे विविध प्रकार खाऊन अंतरात्मा तृप्त झाला होता. मी चवीने खातोय बघून बायकोही नवीन नवीन प्रकार शोधून काढत होती. छोट्या चंकी मंकीचा समजूतदारपणा तर वाखाणण्यासारखा होता. सात दिवसात एकदाही त्याने भोकाड पसरलेले नाही.


सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

लेखक: मार्गी | प्रसिद्ध:
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी) ✪ कर्नाटकातील ग्रामीण भागातून राईड! ✪ कर्नाटकातला मराठीचा प्रभाव ✪ "यारगट्टी" गांव- ओ यारा, गत्ति कित्थे गत्ति? ✪ "क्षमस्व, गावात तुमची सोय करता आली नाही!" ✪ मुक्कामाच्या


इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:
पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला. २००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल. मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली. पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले.