Welcome to misalpav.com

बाळेश्वर मंदिर आणि पेडगावचा किल्ला

लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
पेडगावची भग्न मंदिरे: भाग १ पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिर पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढ्यातच आहे हे भग्न मंदिर, ते आहे बाळेश्वराचं. आजमितीस ह्या मंदिराचे शिखर आणि सभामंडप संपूर्ण उध्वस्त स्थितीत असून फत गर्भगृह शाबूत आहे. जरी हे मंदिर छोटेखानी आणि भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणं आहे. कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक देखणंही दिसत असावं असं मला वाटतं. हे मंदिर एका अधिष्ठानावर उभारले असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे.


एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५ त्या रात्रभर ,मला झोप आली नाही. अति क्षोभाने ! मी घाबरलो होतो म्हणून नाही. मी भित्रा नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या द्वंद्वात माझा प्राण जाईल अशी भीती माझ्या मनाला एकदाही स्पर्ष करून गेली नाही. मी फक्त लिझाचाच विचार करत होतो. माझ्या मेलेल्या इच्छा आणि मला काय केले पाहिजे याचा.


मेरे प्यारे दुश्मन

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.


गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक: शाहिर | प्रसिद्ध:
खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद! मी पाया पडते पदर पसरते सवत मला हो आणू नका || घरात होती आई ची मी लाडकी गळसरी बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी गोगलगाय मी अशी नखानं येता - जाता खुडू नका मी पाया पडते ..........


साजणी आता इथे...

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा. माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.


एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ४

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ४ .....माझ्या चेहऱ्यावरील वेडेवाकडे हास्य, माझे एकदम गप्प बसणे, निघून जाण्याची तीव्र इच्छा हे सगळे माझ्या चेहऱ्यावर उमटले असणार. माझी आतडी एक नाही अनेक कोल्हे कुरतडत होते. हेवा, मत्सर, स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव, राग हे सगळे कोल्हे मला कुरतडत होते.


पंचगंगातिरीचा दिपोत्सव

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.


एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ३

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ३ ...आम्ही बराच वेळ फेरफटका मारला. संध्याकाळ झाली आणि तोपर्यंत आम्ही फार कमी बोललो होतो. अनुभव नसलेले प्रेमिक जसे गप्प असतात तसा मीही चूपचाप चालत होतो आणि तिला बहुधा मला काही सांगायचेच नसेल. पण ती कशावर तरी विचार करीत होती खास ! मधूनच ती मान हलवत होती आणि जे पान तिने तोडले होते त्याच्याशी चाळा करत होती.


फिरुनी केली मनात दाटी...

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.


माझे शाळा अनुभव

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा.