Welcome to misalpav.com

बहारो फूल बरसाओ....

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है...... हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे. लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही.


वीस वर्षांनंतर (भाषांतर)

लेखक: स्मिताके | प्रसिद्ध:
बीटवरचा पोलीस कडक रुबाबात रस्त्यावरून फिरत होता. ती त्याची रोजची सवयीची चाल होती. तो काही कोणाला रुबाब दाखवावा असा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याला पाहायला तिथे फारसं कोणी नव्हतंच. रात्रीचे दहा वाजत आले होते. थंड वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या. पावसाचा ओलावा दाटून आला होता. त्यामुळे रस्ते जवळजवळ निर्मनुष्य झाले होते. चालता चालता तो रस्त्यावरच्या दुकानांची दारं ढकलून पाहत होता. हातातली काठी छानशा लयीत फिरवत होता. अधूनमधून वळून आजूबाजूच्या शांत रस्त्यांवर जरबेची नजर टाकत होता. ताठ, दमदार पावलं टाकणारा तो दक्ष पोलीस म्हणजे जणू मूर्तिमंत शांततेचा रक्षक.


रायरेश्वर मोहीम

लेखक: चक्कर_बंडा | प्रसिद्ध:
रायरेश्वर मोहीम जून ११,१२, २०२२ Raireshwar महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सीमेवर असलेलं रायरेश्वर पठार हे इतिहासाच्या पानांमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहे.


आज्जी गेलीय सोडून

लेखक: चांदणे संदीप | प्रसिद्ध:
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे


ज्वाईनिंग लेटर....

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला. सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला. गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली. करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली. रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता. वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे. त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण". नाव काय तुझे? काको दानवाने विचारले. हवालदार बाकीच्यांना टाका आतमधे,याला इथेच सोडा.


विनिपेग डायरीज-३

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा.... झाले असे की जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा सगळ्यांना असे वाटले की हे काहीतरी टेक्निकल फोन्स, इ पी बी एक्स मेंटेनन्स, व्हॉइस रेकॉर्डिंग अशा प्रकारचे काम आहे.


पहिला पाऊस

लेखक: VRINDA MOGHE | प्रसिद्ध:
*पहिला पाऊस* नेहमीच्या दिमाखात तो अवतरलाच. किती दिवस हुलकावण्या देत होता. संध्याकाळी आकाशात पसरलेल्या संधिप्रकाशानेच तो येतोय हे कळवलं, हलक्या वा-यांच्या गार झुळूकांनीच हळुच कानात सांगितलं 'तो येतोच आहे लवकरच'.हळुहळू मेघ दाटून आले, वारा सुसाट झाला. आणि..आणि...*तो आला*. ढगांनी आता जोरात नगारे वाजवायला सुरूवात केली, विजांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं..आणि भुईवरची माती तर..आनंदाने त्याच्या टपोरल्या थेंबांच्या गंधाने मोहभरीत होऊन..त्याचा गंध चहुकडे उधळीत सुटली, दिसेल त्याला त्या गंधाने वेडं करून टाकलं तिने.. अहाहा! सगळेच त्या मृद् गंधाने वेडावून गेले..धुंद झाले.