चिरकुट मुलगी--२
(चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273)
“अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.”
“लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.”
जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला.
“नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले.
“जाम सुद्धा नाही? लोणी नाही, जाम नाही, केक नाही, जेली नाही, सफरचंद? तेही नाही.