Welcome to misalpav.com

शशक'२०२२ - कळ

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती. राणा ! झोपडपट्टीचा दादा ! आपल्या नव्याको-या बुलेटचा सायकलने उडवलेला रंग बघून त्याचे खोपडे सटकले. "बच्चा है भाई, जाने दो !" टोळीने म्हणेपर्यंत त्याच्या हातात तो कुप्रसिद्ध सुरा चमचमायला लागला होता. ह्या सु-याने राणा कसा एका झटक्यात पोटाचा कोथळा बाहेर काढतो हे बरेचदा ऐकले होते त्याने मित्रांकडून. "मर साले अब " म्हणत एका झटक्यात सुरा त्याच्या पोटात फिरला. एक कळ उठली आणि रक्ताने त्याचे कपडे भिजायला लागले. थडथडणा-या त्याच्या शरीराला राणा आता गदागदा हलवत बोलला.. उठ बाळा ! कपडे बदलवून घे !