Welcome to misalpav.com

माझी राधा- ६

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला. मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते. मागील दुवा : http://misalpav.com/node/50097 बराच वेळ त्या फांदीवर बसून राहिलो. डोक्यातला राग जात नव्हत. मग मीच माझ्याशी बोलू लागलो. "बघ तुला आता कळेल कान्हा किती चांगला आहे ते. दहीदूध की काय एकटा खातो का. माझ्या सगळ्या मित्रांनाही देतो.


श श क २०२२ - नवा काळ..

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती.


शशक'२०२२ - जॉन डो

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच. मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ. पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय. इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय. मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. एकच चान्स आहे मला. मी टाकीमागे लपवलेली दाभण उचलतो. अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित अवस्था आलीय.