शशक'२०२२ - आईचा मार
- Read more about शशक'२०२२ - आईचा मार
- 27 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 14299 views
दुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली.
"काय झालं बबड्या?"
"मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली.
रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती.
जेवायला सुरूवात झाली तसा भावड्या रडवेला होत आईला म्हटला, "आई! भोपळ्याची भाजी नाय ग आवडत मला." "खातोयस का मुकाट्याने, का देऊ धपाटा?" आई रागावून बोलली.
"हम्म, कशी मारतेस ग माझ्या भावाला?