Welcome to misalpav.com

शशक'२०२२ - विमनस्क

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती. आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या' इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली . छोटीसी मनू दमली होती.एका खड्ड्यात मनू पडली.ती मोठमोठ्याने रडू लागली.समोरून येणारी दोन तीन टारगट पोरं तिला हसायला लागली, तेव्हा मनूचा सूर आणखिनच वाढला. भांबावल्या मेघाने रव्याकडे पाहिलं... त्याच्या हातातला दगड त्याने जोरात त्यांच्या दिशेला भिरकावला...


भगवद्गीता शांकरभाष्य नमन आणि प्रस्तावना - मराठी भाषांतर

लेखक: अभिजीत | प्रसिद्ध:

आद्य शंकराचार्य जयंती - वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (मे ६, २०२२) आद्य शंकराचार्य वेदोक्त अशा अद्वैत मताचे पुरस्कर्ते होत. केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयी (भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे) वर भाष्ये लिहिली, तत्कालीन भारत देशात चार वेळा भ्रमण करून प्रस्थपित असलेली अवैदीक मते खोडून काढली व वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली. वेदकाळापासून सुरू असलेली आचार्य परंपरा, आद्य शंकराचार्यांनी पुढे सुरू ठेवली.



शशक'२०२२ - कौतुक

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
मी सांगणार, तो लिहणार, मग मोजत बसणार ! नाही गं जमणार हे या लेखकांसारखे शशक लिहणे, हताश होत तो उद्गारला.. तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे.. अस्स ! मी जे केले ते जमेल का तुझ्या मिपावरच्या एका तरी धुरंधराला ? पुरे झाला तुमचा फाजीलपणा ! तुमच्या त्या +१ च्या नादात मी पण फार वाहवत गेले. व्वा ! म्हणजे माझी एकट्याचीच चुक, आता थांबू मग ! अर्थात ! आणि त्या लेखकांना दुसरे बरेच काही सुचत असते म्हंटले, तुम्हाला दुसरे काहीच दिसत नाही ! तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच राहिले नाही राणी!


शशक'२०२२ - स्क्रीनटाईम

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
माझ्या वाढत्या स्क्रीनटाईमच्या व्यसनाबाबचा मानसोपचारतज्ञाने दिलेला रिपोर्ट वाचून होताच बायोटेलीपोर्टेशनतज्ञ डाॅ गफलावाला मला म्हणाले," तुला या व्यसनातून कायमचं सोडवीन मी . फक्त माझ्या एका प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होतोयस असं लिहून सही कर इथे" "काहीही करीन सर पण..." सही करताना मी म्हणालो. "गुड. हे हेल्मेट घालून या होलोग्राम प्रतिमेत उभा रहा" कानातला कल्लोळ दुर्लक्षून मी होलोग्राममधे उभा राहिलो. डोळे उघडले तेव्हा समोर असलेले डाॅ गफलावाला म्हणत होते," कसं वाटतंय? आता वाढता स्क्रीन टाईम वगैरे विसरून जायचं" "खरंच?" " हो, काळ कायमचा गोठवलाय तुझ्यासाठी, पण.." ............ "सर ! माझे हात ?


शशक'२०२२ - नियंता

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
भगीरथ कोसळणार्‍या भुयारातून बाहेर आला. समोरचे दृष्य पाहून त्याचे अवसान गळाले. पाणीच पाणी. तो दिशाहीनपणे धावू लागला. इतरांचीही तशीच धडपड चाललेली. पळतापळता तो धडकला. “भगीरथ?” बाळकृष्ण होता. “बाळकृष्ण, तिथे... तिथून प्रकाश येतो आहे..” “तीचं काय ? ती बाहेर पडली ?” अंधारात भगीरथला त्याचा चेहरा दिसत नव्हता. “न..नाही. इतक्या खोलातून यायला काही रस्ता नाही.” बाळकृष्णाची आकृती धडाडत भुयाराच्या तोंडात शिरताना त्याला दिसली. भगीरथ काही वेळ थिजल्यासारखा थांबला आणि पाण्यातून धावू लागला.


शशक'२०२२ - नथिंग न्यू अंडर द सन

लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
“मुळ्याची भाजी, वेळ पाहुन खावी” अशी म्हण का बरं नाहीये ? चौथी ब मधल्या त्याने तळमळत विचार केला. डोळे मिटलेले होते. पाच मिनीटं “मौन”मध्ये काढणे अशक्यप्राय. काहीतरी करायलाच पाहीजे. त्याने डोळे किलकीले केले, आणि टिचर मोबाईल मध्ये डोकं खुपसून आहेत पाहुन त्याला हायसे वाटले. डेस्कवर सेलोची स्टीलची बाटली होती. ती स्टीलच्या बाकावर पाडायची आणि होणार्‍या आवाजासोबत आपला कार्यभाग उरकून घ्यायचा. दुसरा पर्यायच नाही, बाटली डेस्कच्या उजव्या कोपर्‍यात होती.


माझी राधा - ५

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
माझ्या चेहेर्‍यावरचे ते हसू तुझ्या चेहेर्‍यावरही पसरते. का कोण जाणे आपण दोघेही एकदम हसायला लागतो. आपल्याला कसला आनंद झाला आहे हे दोघानाही समजत नाही. समजण्यापलीकडची भावना. दोघांनाही एकाच वेळेस जाणवते. एक अलौकीक अनुभूती ,बासरीच्या स्वरांनी , त्या अनहद नादाने आपल्याला दिली.
मागील दुवा http://misalpav.com/node/50080 अनहद नादाची एक गम्मत असते. त्याला सुरू व्हायला कसलेही कारण लागत नाही. तुम्ही मनात विचार आणा , तो स्वतःहोऊन येतो.बोलवावे लागत नाही. कधीकधी तर तो मनातच वास्तव्य करतो. मुक्कामाला असतो. त्या दिवसापासून मी ही थोडा बदललो.


5 मे

लेखक: नगरी | प्रसिद्ध:
आज 5 मे, थोर संगीतकार नौशाद अली यांचा स्मृतिदिन. हा धागा त्या साठी , मिपाकरांनी त्यांच्या आठवणी आणि आवडती गाणी प्रतिसादात लिहावीत. 1982-83 सालचा काळ असावा,त्यावेळी घरी b/w tv घेतला होता.त्यावर फक्त मुंबई दूरदर्शन दिसे,ते ही 30 फुटी अँटेना लावल्यावर. त्यावर एकदा नौशादजींची मुलाखत ऐकली होती. त्यातला एक किस्सा आजही आठवणीत आहे. त्या वेळी ते मुंबईत इंडस्ट्रीत नशीब अजमावल्याला आले होते. दादरला एका स्टुडिओत प्रयत्न चालू होते पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्या स्टुडिओच्या समोरील एक पुस्तक दुकानात ते काम करीत आणि रात्री त्या दुकानाच्या बाहेरील फडताळावर झोपत.


काणकोण, दक्षिण गोवा येथे घालवायचे दिवस - काय काय करावे/ करू नये

लेखक: शैलेश लांजेकर | प्रसिद्ध:
काणकोण, दक्षिण गोवा येथे येत्या १५-२० दिवसात किमान २-३ दिवस घालवण्याचा विचार आहे... दक्षिण गोव्यात प्रथमच जात आहे. तरी जाणकारांनी काय काय करू शकतो ( कुठल्या स्थळांना भेटी दयाव्यात, खाण्याची उत्तम ठिकाणे, तिकडे घ्यावयाची काळजी वैगरे वैगरे) या बद्दल सल्ला द्यावा.


महाराष्ट्राचा आद्य वंश – सातवाहन घराणे

लेखक: नागनिका | प्रसिद्ध:
( नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त दैनिक संचार मध्ये प्रकाशित झालेला लेख) महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही.