Welcome to misalpav.com

रोज किती पाणी प्यावे?

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे


आङळे वाङळें साहित्य संमेलन

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?


प्रिय सचिन

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.


कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } .my-heading { background-color : #f0f0f0; color : #000; margin-top :16px; margin-bottom :16px; padding : 12px; font-size : 17px; font-weight : bold; border : 1px dashed #9fa9a3 } .notes { background-color : #f0f0f0; color : #000; margin :16px; padding : 12px; border : 1px solid #9fa9a3; } १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील


ती २५ तारीख

लेखक: शानबा५१२ | प्रसिद्ध:
आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात.


खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना. डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता.


आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.


हसरे चेहरे

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य. माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही. वेळ ठरलेली,अशिक्षित,एकदाच घंटी वाजवणार,दार उघडताच सुहास्य मुद्रेने "गुडमॉर्निंग "'जरूर म्हणणार.


"मी वसंतराव" च्या निमित्ताने

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
शहर - आपलं नेहेमीचंच स्थळ - guess करायला एकदम सोपं दिवस - मावळलेला workday वेळ - रात्री उशिराची "मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो). पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या.