||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)
- Read more about ||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)
- 26 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 13450 views
नमस्कार मिपाकर्स
या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण.
नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी,
'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही.