Welcome to misalpav.com

ठेचेचा दगड

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
दगडाची ठेच लागता रक्त येई पायात कशास होता पडला दगड असा रस्त्यात कितीतरी असे अडले असती ठेच लागून पडले असती परी न कुणी विचार करती फेकून द्यावा तो दगड कुठती असाच आला वेडा कुणी खाली वाकला तो झणी उचलूनी दगड तो पायी लांबवर कुठे फेकूनी देयी - पाषाणभेद १९/०३/२०२२


माझी राधा - ३

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही. आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात. बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो. मागील दुवा सा ध प म , प ग रे सा. पंचम गंधार घेत कोमल ऋषभावरुन षड्जावर येताना काही वेगळेच रंग डोळ्यासमोर उभे करतो हा राग. कोणी शोधला असेल. ज्या कोणी शोधला असेल त्याने तो अनुभव घेतला असेल. सामवेदात उल्लेख आहे याचा. पण संगीत हे अपौरुषेयच. अमूर्त. अनुभवायचेच. स्वर कानावाटे ऐकू येतात पण ते अंगात भिनतात. मग अलौकीक अनुभव देतात. बासरीचा नाद अनहत. तो तुमच्या रोमारोमात जातो.


नऊला दहा कमी

लेखक: भागो | प्रसिद्ध:
नऊला दहा कमी चिंतामणी लोकल मधून उतरला आणि धावत सुटला. स्टेशनच्या घड्याळात पहिले. अरे बाप रे! नऊला दहा मिनिटं कमी. असाच पळत गेला आणि लिफ्ट वेळेवर मिळाली तर अजूनही वेळेवर ऑफिस गाठता येईल. चिंतामणी रस्त्याच्या कडेकडेन पळत होता. “एक्स्क्यूज मी प्लीज” म्हणत पळत होता.


१००व्या ईबुकचे लोकार्पण...

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
मित्रहो, ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद. १००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती. ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत.


बुरा ना मानो आज होली है !!

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
थोडं उत्तेजक पण तरीही सवंग नसलेले , किंचीत कलात्मक, जरा वेगळं आपल्याला लिहीता येतं का याचा शोध घेतोय,कृपया हलके घेणे. मागे एक दोन बालकथा लिहील्या, त्या मलाच आवडल्या, त्यानंतर मोठ्यांनी काय घोडं मारलयं, त्यांच्यासाठी कथा नको का ? असा विचार केला....एक प्रयत्न... ----------------------------------------------------------------------- समोरची दारात रांगोळी काढत होती, दोन्ही हातात रंग घेऊन तो गेला. "ओह रंग....नको म्हणून" ती वळली, "असं कसं...


परदेशवारी-३

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
पहिला दिवस अविस्मरणीय असतो मग तो कॉलेज मधला,नोकरीतला किवा आणखीन कुठलाही.तशीच माझी या नवीन शहरातली पहिली भ्रमंती.जमकर रॅगिंग झाली.आता वातावरणाची सवय झाली (Acclimatize).भ्रमणध्वनी पण मिळाला व घरातून NOC त्यामुळे भटकंतीचा उत्साह द्विगुणित झाला.


जुमेरात @ अमेरात

लेखक: सरनौबत | प्रसिद्ध:
भारतातून ओमान देशात येतो तेव्हा सर्वप्रथम नजरेत भरतात ते येथील सुबक आणि गुळगुळीत रस्ते. आपल्याइथे एका किलोमीटरमध्ये शेकडो खड्डे असताना इकडे शेकडो किलोमीटर एकही खड्डा नाही. अर्थात कमी वाहने आणि पाऊस जवळजवळ नाही; ह्यामुळे देखील रस्ते पटकन खराब होत नसावेत. कुठेही जा, फोटो काढावेत इतके सुरेख रस्ते. काही वर्षांपूर्वी मस्कतमधील 'अमेरात' ह्या उंच डोंगरावर असलेल्या गावात जाण्यासाठी छान नागमोडी घाट बांधला. घाट चढून वर गेल्यावर खालचे शहर फार सुंदर दिसते. विमानातून दिसतात तशी छोटी घरे आणि इमारती. विशेषतः रात्री दिव्यांच्या झगमगाटात तर डोळ्याचे पारणे फिटते.


कायप्पावरील ढकलपात्र

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
*लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द* (खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते) *मृत्यूपेक्षा या जगात खरे दुसरे काहीही नाही.* *जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे.* *पण मला व्हीलचेअरवर बसवले जाते!* *या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग, महागडे कपडे, महागडे बूट, महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे.* *पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे!* *माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही.* *माझं घर माझ्यासाठी राजवाड्यासारखं आहे पण मी दवाखान्यात एका छोट्याशा बेडवर पडून आहे.* *मी या जगातल्या पंचतारांकित हॉटेल्