Welcome to misalpav.com

अमर्त्य

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
mipa नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले.


झुंड

लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.



शेन वॉर्नची अकाली एक्झिट

लेखक: किसन शिंदे | प्रसिद्ध:
1 आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.


मेघ भरुनी येताना.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. रिमझिमती असते बरसात चिंब चिंब भिजलेली रात कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. मृदगंध भारला वारा भारी गंधाने गगन धरा वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. हे तरूवर सर्व स्तब्ध शांत सभोती उदास हा एकांत अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.


नको पुन्हा एकदा

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा. हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा. डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा. देवा तुच धर हात माझा या मावळतीला झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.


नकोच ते युद्ध नको

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२


वाऱ्यावर जसे पान

लेखक: चांदणे संदीप | प्रसिद्ध:
नीज भरते दिशांत माझे रिते नीजपात्र उतरूनि ये अंगणी जरी हळुवार रात्र रात्र रात्र जागते गोड स्वप्नातूनि धुंद गात राहते अबोल मौनातूनि येती कानी दुरून सूर सारंगीचे छान मन खाई हेलकावे वाऱ्यावर जसे पान पान पान जागते पाचूच्या बनातूनि शुभ्र सोनसकाळी झळाळते दवातूनि - संदीप चांदणे


पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत. जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".