Welcome to misalpav.com

हे वाचा: चित्रलेखा

लेखक: अनुस्वार | प्रसिद्ध:
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.


एकाकी वाट चालताना

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
एकाकी वाट चालताना भासे तुझाच स्पर्श आठवण अजुनी येते जरी सरली कितीक वर्ष त्या अनवट डोंगरवाटा चढताना धरीला हात वचन दिलेस तू मला देईन कायम साथ संगतीने तुझ्या घालविले मी सुखद क्षण निवांत आताच कसे मग झाले हे विश्वच सारे शांत तू आहेस अजुनी माझ्या चिरकाल स्मृतीतून विहरत आठवणीत लाविला चाफा जो आहे अजून बहरत


कार्नेगी देवाची कहाणी

लेखक: भागो | प्रसिद्ध:
ऐका देवा महाराजा कार्नेगी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and far from the people. लोकशाही इतकी घनघोर नांदत होती की अगदी कहरच झाला होता. लोक उठसूट मतदान करायचे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरी बाहेर कुठे सहलीला न जाता मतदानकेंद्रावर सहल काढत असत. म्हातारे लोक व्हीलचेअर वरून घेऊन मतदानाला जात असत.


कातरवेळ

लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:
कातरवेळ -------------------------------------------- जेव्हा केशरी रंगाचं अस्तित्व पुसत राखाडी रंग आकाशात पसरत जातो तेव्हा उत्फुल्लपणाचं अस्तित्व पुसत अस्वस्थपणा मनात उतरत जातो मनात अनामिक हुरहूर दाटून येते कारण ती कातरवेळ असते जेव्हा पाखरं माघारी फिरतात जेव्हा माणसं घरात शिरतात तेव्हा कुठल्याकुठल्या आठवणींची वटवाघळं मनात भिरभिरतात कधी कोणाची दुखावणारी मनात खोल याद असते कारण ती कातरवेळ असते मन अंतर्मुख होतं मन आधारहीन वाटतं साऱ्या जगाशीच संबंध तुटल्यासारखं वाटतं ती साली - त्रिशंकू अवस्था असते कारण ती कातरवेळ असते कधी उदासी कवटाळते अन कशी शांतता वेटाळते ही वेळ अशी का ज


मराठी भाषा गौरव दिन अभंग

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२ मराठी भाषा गौर


सामना (३)

लेखक: नीलकंठ देशमुख | प्रसिद्ध:

सामना (३)
(पूर्वसूत्र: वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात सव्वीस जानेवारीला होणारे क्रिकेट सामन्यासाठी,अनेक अडचणींना सामोरे जात न्यायाधीश संघाने तयारी केली आहे.आणि सामन्याचा दिवस .)
    शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला.झेंडावंदनानंतर
साडेदहा वाजता,वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना होणार होता.तालुक्याहून ठोंबरे व आणखी दोन न्यायाधीश
( दि.न्या.क.स्त) हे संघातील खेळाडू वेळेत पोहचले होते.सामन्यासाठी मैदान सज्ज झाले होते.मंडप  उभारलेला होता.तो वकील,न्यायाधीश,त्यांचे कुटुंबीय,



मीर तकी मीरची एक गझल

लेखक: आदित्य कोरडे | प्रसिद्ध:
#मीर_तकी_मीरची_एक_गझल खूप दिवसापूर्वी एक चित्रपट पहिला होता ‘काली सलवार’ नावाचा . साsदत हसन मंटोच्या ह्याच नावाच्या लघु कथेवर बेतलेला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एका पूर्वी कधीही न ऐकलेल्या गझलचे शेर होते. गायकाचा आवाज आणि शब्द अतिशय वजनदार वाटत होते पण अर्थ अजिबात समजत नव्हता. कवीचे नाव ‘मीर तकी मीर’ चित्रपटाच्या श्रेय नामावली मध्ये सापडले.


मराठी भाषा दिन

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! – कुसुमाग्रज मिसळपाव परिवारात सामील झाल्यावर सुरुवातीला काही कवीता, मनोगते,मुक्तके राजभाषा हिन्दी मध्ये लिहिल्या, प्रतीसाद संमिश्र आले, गदारोळ माजला, टपल्या, टोमणे,काही शालजोडीतले, काही पुणेरी वर वर स्तुतीपर पण सरळ कसोट्यालाच हात घालणारे. माय मराठीत जन्मलो पण कमी वयातच दूर जावे लागले म्हणून सहवास कमी लाभला. राजभाषेचा सहवास भरपूर. दोघींवर तितकेच प्रेम. आता परत माय मराठीच्या कुशीत आल्या मुळे मराठी भाषेतील अमूल्य रत्ने दृष्टीक्षेपात आली.


भारताचे शीत (पेय)युद्ध!

लेखक: आदित्य कोरडे | प्रसिद्ध:
भारताचे शीत (पेय)युद्ध! इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठा शीख मोगल अशा एतद्देशीय सत्तांना हरवून. पण नंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर असे क्रांतिकारक किंवा टिळक,गांधी,पटेल ह्यांच्या सारखे पुढारी मात्र समाजातल्या सर्वसामान्यवर्गातून, म्हणजे पूर्वी सत्ताधारी नसलेल्या वर्गातून पुढे आले. भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाचे स्वरूप काहीसे असेच आहे.


जगत् त्राही माम्

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
त्रा त्रा त्रास-पुटीन रशीयन मोठा वाॅर मशीन जगाचा नवा पोलीस पाटी sssssल म्हातारा बायडन अन् कागदी घोडे नाटो जिसकी लाठी उसकी भैस जुनी कागदपत्रे फाटो त्रा त्रा त्रास-पुटीन रशीयन मोठा वाॅर मशीन जगाचा नवा पोलीस पाटील निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की नाही पळणार मी झेलीन की लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी धमकी जर नाही आलात शरण तर हजारोंचे अटळ आहे मरण इमरान वीटला कर्जबाजारा समोर जावून घातला मुजरा मायावी हॅकर्स नवे इंद्रजीत करीती बँकअकाँउंट्स चीत कूटनिती ग्रँडमास्टर चा हल्ला थेट राजा घेरलाल पुढच्या क्षणी चेकमेट मग आता आक्रमील का चीन ब्रम्होस आहे, हिंदूस्तान चेचीन