Welcome to misalpav.com

लळा.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी ऊन चांगलच जाणवत होतं. मे महिन्यात संध्याकाळचे सात वाजेपर्यंत तरी अंधार होत नाही. आमचं खोपटीत लाकडं भरण्याचं काम सुरु होत. बाबा लाकडं रचून ठेवत होते, मी आणून देत होतो. बघता बघता अंधारून आलं. पाऊस पडण्याची चिन्हं दिसू लागली, आई वाळत टाकलेले कपडे काढायला धावली, आम्ही भरभर लाकडं खोपटीत टाकू लागलो. सगळ्यांची धांदल उडाली. लहान मुलं अंगणात उड्या मारत येरे येरे पावसा गाणं म्हणू लागली. आणि बघता बघता जोराचं वादळ सुरु झालं. सगळी लहान मुलं आंब्याखाली धावली. त्यांना सांभाळणाऱ्या आज्यांची धांदल उडाली.


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती , पेपरमध्ये वाचले "आम्हा घरी धन,* *शब्दांचीच रत्ने..." _ जगतगुरू तुकाराम मी सुटलो... बुंगाट आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, जुळवू प्रयत्ने, यमके ही. काय हे जाहले, कोसळला बाजार, कोणता आजार म्हणावा हा? जगाचा पोलीस पाटील, तू ते तर मी हे करेन भेदरला बिचारा युक्रेन युद्ध ज्वर लोक हैराण त्यात, निवडणूक धुरळा, जणू अंगावर झुरळा, झटकती वाहक ही गांजले इथे ट्रॅफिक जाम अमृतांजन बाम, चोपडती शिक्षणाचा खेळ खंडोबा तास ऑनलाईन इयत्तेला सलाईन बोंबलाई यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!


१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...


मला भेटलेले रुग्ण - २३

लेखक: डॉ श्रीहास | प्रसिद्ध:
https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.


अंतरंग - भगवद्गीता - भाग ३

लेखक: शीतलउवाच | प्रसिद्ध:
दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग! दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन.


उत्तर..! (अतिलघुकथा)

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
{ॲन इमॅजिनरी व्हॉट्सअप चॅट लीक्ड :-) } अंधारात त्याच्या व्हॉट्सअप स्क्रीनवर नवीन मेसेजचं एक ग्रीन वर्तुळ चमकलं.. "'तूच आहेस का रे तिथे खाली?"' तिचा मेसेज पाहून तो थोडा वेळ तसाच शांत बसून राहिला. मग रिप्लाय दिला, होय.! "'अरे देवा..! कधीपासून बसलायस तिथे? मी आत्ता पाहिलं वर येताना..! तू जा बरं तिथून..''' आजची तिसरी रात्र..! तू उत्तर दिलं नाहीयेस अजून.! "'अरे पण हे असं रस्त्यावर नको बसत जाऊस अरे रात्र रात्रभर..! मला त्रास होतो उगाच..!"' मी काय कुणाला त्रास देणार..! माझा मी शांतपणे बसून आहे फक्त..! "'ओके ओके..


व्हॅलेंटाईन दिनी

लेखक: श्रीगणेशा | प्रसिद्ध:
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)


ब्रेकअप

लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:
ब्रेकअप ---------------------------------------------------------------------------------------------------- वॅलेंटाईन डेला समर्पित ... -------------------------------------------------------------------------------------------------- तरुण मुलीची आई म्हणजे जिवाला घोरच की ! अगदी नॉर्मल परिस्थितीत सुद्धा . म्हणजे मग इतर परिस्थितीत तर विचारच करायला नको. मीही त्याला अपवाद नव्हतेच. पोरीचं ब्रेकअप झालंय अशी शंका मला होती... -/-/-/ निशा कॉलेजमध्ये होती. त्यात तिचं कॉलेज नावाजलेलं . अन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत पुढारलेलं . कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस ! ते ती पुरेपूर एन्जॉय करत होती.