दुर राहाणाऱ्या लोकांचा "भावनिक भागांक"(Emotional quotient) हा जवळपास राहाणाऱ्या लोकां पेक्षा जास्त आसतो.हा सैन्यातला स्वानुभव, कायमच घरापासून दूर,वर्षातून एकदाच काय ते सुट्टीवर जायचे, त्यामुळेच दूर राहणार्या मुलांना काय वाटत असेल याची जाणीव ठेवूनच सामानाचे नियोजन केले होते. शिकागोला पोहोचल्या नंतर सकाळपासून मुलांच्या मीत्र मैत्रिणीचे फोनवर फोन, 'आले का आई बाबा?फ्लाईट वेळेवर आली ना!" वगैरे.
बरोबरच आम्ही आल्याशिवाय सुटकेस उघडाल तर बघुन घेऊ आशी प्रेमळ धमकी पण देत होते. करोनामुळे नाईलाजास्तव एक आठवडाभर थांबावेच लागले. घरातच क्वारटाइन होतो.