Welcome to misalpav.com

डॉ वि ह सरांना आठवताना... भाग १

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
9 1 डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती.


तुझ्या घरातले अनारसे

लेखक: चॅट्सवूड | प्रसिद्ध:
तुझ्या घरातले अनारसे कधी खायला मिळतील? माझ्या घरातले लाडू आता कधीही फुटतील!! तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील आमच्या चिवड्यांचे डबे आता रिकामेच राहतील तुझे ते चिरोटे (२) कायम लक्षात राहतील माझ्या त्या कडबोळ्या वातड होऊन जातील तुझ्या या फराळाला घरातले ही 'दात' देतील उन्हात टेरेसवर वाळवून वर्षभर पुरवून खातील...


प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.


तोंड भरून बोला !

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग २ भाग-१ इथे ................................................................................................................... मागील भागात आपण हाताचे वाक्प्रचार एकत्र गुंफून एक गमतीशीर गोष्ट रचली. या भागात ‘तोंड’ या शब्दावरूनचे २५ वाक्प्रचार घेऊन अन्य एक गोष्ट रचली आहे. तोंडाचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी.


लोगो...

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
लोगो.. 'अ' कंपनीला 'ब' कंपनीने टेकओव्हर केलं. 'अ' कंपनी तशी जुनी पण गावठी. 'ब' कंपनी एकदम आंतेर्रराष्ट्रीय! काही तांत्रिक कारणाने 'अ' कंपनीच नाव बदलता येणार नव्हतं. त्यामुळे ती ब कंपनीची ग्रुप कंपनी म्हणून ओळखल्या जाणार होती. कागदी टेकओव्हर पूर्ण झाल्यावर हळूहळू प्रत्यक्षात कब्जा करणं सुरू झालं.रोजच्या रोज पॉलिसी,प्रोसेस, कल्चर, इथिक्स, कॉम्पलायन्स वगैरे शब्दांचा भडिमार सुरू झाला. मग कंपनीचा लोगो या विषयावर गाडी आली. आता अ कंपनीच नाव बदललं नसल्यामुळे आणि लोगो नावावरूनच बनलेला असल्यामुळे त्यात फार काही बदल करता येणार नव्हते. शिवाय त्या लोगोचा ब्रँडही मार्केटमध्ये ओळखीचा होता.


इतिहासाचे डिटेक्टिव

लेखक: केदार भिडे | प्रसिद्ध:
आपण इतिहासात जसजसे मागे जाऊ तसे त्या त्या काळाची कहाणी सांगणारी साधने बदलत जातात. अधिक मागे गेले की एक काळ असा येतो की लिहिलेले असले तरी नेमके काय लिहिले आहे हे वाचता येत नाही किंवा त्यातही काळाच्या ओघात शिल्लक राहिलेले अपुरे असते. अजूनही मागे जावे तर लिखित साधने अगदीच सापडेनाशी होतात. अशावेळी इतिहास जाणून घेताना आपल्याला डिटेक्टिवच्या भूमिकेत शिरावे लागते. अनेक घटना या लिखितपूर्व काळात घडलेल्या असतात आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आपला ठसा मागे ठेऊन जातात. गुन्हेगार कधी हाताचे ठसे मागे ठेवतो, बुटाचा ठसा सोडतो, एखादा केस किंवा पार्किंगमध्ये गाडीच्या चाकाचे ठसे मागे ठेऊन जातो.


अवचित गवसावे काही जे...

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
प्रश्न पडावा असा की ज्याच्या उत्तरातुनी नवा प्रश्न मला चिडवीत नव्या उत्तरास शोधत यावा वाट दिसावी अशी की अद्भुत प्रदेशी जाताना विरून जाव्या पुसून जाव्या सार्‍या हळव्या खुणा सूत्र सुचावे असे की ज्याने यच्चयावतास सहज गुंफुनी जरा उरावे अधिक गुंफण्यास अवचित गवसावे काही जे ज्ञातापलिकडल्या मितीतुनी दाखवील इथल्या स्थलकाला वाकुल्या


बस करा वृद्धांचे फालतू लाड

लेखक: कोंबडी प्रेमी | प्रसिद्ध:
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय . ६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत. वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे. आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये.