Welcome to misalpav.com

वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी?

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
'शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड कशी?' म्हण सुपरिचित आहेच. मेमे व्हायरल करणार्‍यांचे म्हणी बनवणारे पुर्वज असावेत कि काय अशी शक्यता वाटते. या म्हणी वापरण्यास सुलभ असल्यातरी बनवणे आणि व्हायरल करण्याचे कौशल्य सोपे नसावे. 'जाणारा जातो जिवानिशी आणि मास्क न वापरणारा म्हणतो मास्क कशाला' अशी म्हण जाणिव पुर्वक बनवली तरी व्हायरल करणे कठीणच. तर असाच प्रश्न अस्मादिकांना वात्तड चकली जाणीवपुर्वक कशी बनवावी असा पडतो.


दिवाळी विशेष लेख- बोगी-वोगी रेस्टॉरंट

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे.


आठवणीतील दिवाळी !

लेखक: kvponkshe | प्रसिद्ध:
आठवणीतील दिवाळी ! दिवाळी म्हणजे सणांचा राजा ! २१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच ! पण या दिवाळीचा आनंद असा सहजासहजी मिळत नसे. त्या आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार पडावे लागे. दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई. आणि बहुदा पहिला पेपर गणित किंवा इंग्रजीचा असे. म्हणजे दसऱ्याला मजा करायची सोडून आम्ही मान मोडून अभ्यास करावा अशी शाळेची अपेक्षा असे. (आम्ही शाळेच्या अपेक्षा कधीच पुऱ्या केल्या नाहीत हा भाग अलहिदा ! ). सहामाही चा शेवटला पेपर बरेचदा चित्रकलेचा असे. आणि त्याआधी भूगोलाचा.


(हलगी)

लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
पेरणा किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी

.. शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला मोह अनामिक कसा सुटावा?


नारळ पुराण

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
ही कोणतीही पाककृती नाही पण अनेक पाककृतींमधला एक महत्वाचा घटक असलेल्या नारळाचं हे वर्णन म्हणून या सदराखाली लिहिते आहे. माहेर नि सासर दोन्ही कडून कोकणस्थ आणि कोकणातच रहात असल्याने नारळावर जरा जास्तच प्रेम. कधी कधी हे प्रेम इतकं उतू जात की नवरा वैतागून म्हणतो," आता नाश्त्याला नारळाची भजी, जेवायला नारळाची पोळी नि भाजी,प्यायला नारळाचं सरबत केलंस की पुण्य मिळेल" पण खरंच , ज्यात त्यात नारळ अर्थात ओलं खोबर घातल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही. कुठलीही उसळ ही ओल्या खोबर्याशिवाय अपूर्ण. पलेभाजीत नारळ हवा. चटणी खोबर्याचीच. आमटीत खोबरं हवंच. याच मुळे दर दोन दिवशी घरात नारळ फुटतो.


पायातली वहाण..

लेखक: Jayagandha Bha… | प्रसिद्ध:
पायातली वहाण... तुला फक्त येते, श्रीखंड अन् पुरी.. आवडत नाही तुला, राईस अँड करी.. आम्ही जातो केळवणाला, तू बस घरी.. कसं आहे, पायातली वहाण, जरा पायातच बरी... येऊ का रे ऑफिसला..? मारते एक फेरी.. क्रेडिट आणि डेबिट मधलं, कळतं का काहीतरी..? घरी बस तुझी तिथेही, कटकट नको भारी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. लाव ना रे आजीला फोन, तिची तब्येत नाही बरी.. इतक्या वेळा शिकवलं तुला, पण विसरतेस तरी.. कधी तुझं तुला जमणार? बावळट आहेस खरी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. दोन पिढ्यांमधील अशीच, वाढत जाते दरी.. हीच परिस्थिती सध्या, तिला दिसते घरोघरी.. समजून घ्यावं ज्याचं त्यानं, गोष्ट आहे खरी..