आयुष्य म्हणजे स्वप्नांची अखंड मालिका
- Read more about आयुष्य म्हणजे स्वप्नांची अखंड मालिका
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2273 views
The dreams can be as real as you want them to be
लक्षणे अशी दिसत होती की देशाला स्वातंत्र्य मिळणारच. दुसऱ्या महायुद्धांत दमछाक झालेले सरकार आता भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करत होते अश्या खात्रीलायक बातम्या केसरीतून वाचायला मिळत होत्या. फक्त आपल्यालाच नाही तर सर्व कॉलोनींना स्वातंत्र्य मिळणार असे दिसत होते. मग काय गोरे इथून जाणार? गोरे सोजीर गेलेतर जाऊद्यात पण गोऱ्या कंपन्या गेल्या तर? असल्या काळज्यांनी झोप लवकर येत नव्हती. सगळे गेले तरी हरकत नाही पण एच जे फोस्टर अॅंड कंपनीची बॉम्बे ब्रॅंच चालू ठेव रे देवा. माझी नोकरी राहील. कृष्णा आणि गंगीचे शिक्षण करायचे आहे.