Welcome to misalpav.com

भास-आभास

लेखक: चक्कर_बंडा | प्रसिद्ध:
तू आहेस ?? की हा तुझा भास आहे ?? वार्‍याच्या झुळकेमागोमाग आपसुक येणारा मोगऱ्याचा धुंद सुवास ?? छे ! हा तर तुझाचं गंध खास आहे.... वही उघडता तुझा चेहरा दिसू लागतो मी ही मग तुला आवडल्या असत्या, अशाचं कविता उलगडू लागतो, तेव्हाही, तू पानभर ओसंडून नुसती दरवळत असतेस… काळ्याभोर आकाशात चंद्राकडे पाहताना ढगांच्या आडून तुचं डोकावताना दिसतेस, दुर पार क्षितिजाच्या पल्याड, पहाट-पालवी उगवेपर्यंत माझ्याबरोबरीने जागी राहतेस...


पावे मराठी

लेखक: रोहन जगताप | प्रसिद्ध:
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती


प्रेषित

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
भौतिकशास्त्रातील जटिल भानगडींनी भंजाळून जायचो तेव्हा आइन्स्टाईन एक अप्राप्य आदर्श -नव्हे प्रेषितच- वाटायचा मग एकदा लोबाचेव्स्किच्या भन्नाट भूमितीने युक्लीडच्या भारदस्त भूमितीला जिथे फाट्यावर मारले तिथे अगदी तिथेच पिंजारल्या पिकल्या केसांचा मिश्किल म्हातारा उपटला. म्हणाला," अरे ठोंब्या, भौतिकीतील न्यूनत्व सावरणाऱ्या सापेक्षतावादाची पुरेशी पुंजी माझ्या गाठीशी असूनही पुंजवाद पचनी पडलाच नाही माझ्या अन् शिवाय UFT(#)च्या गाठोड्याची गहन गाठ सोडवूच शकलो नाही शेवटपर्यंत" तेव्हा कळलं प्रेषितांचे पाय मातीचेच असणं हा नियम असतो अपवाद नव्हे :) ~~~~~~~~~~~~ (#): Unified Field Theory


मातृत्वाचा शृंगाररस

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले


वडोदरा,पावगढ-चंपानेर-४

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
vp - वडोदरा,पावगढ-चंपानेर-१ वडोदरा,पावगढ-चंपानेर-२ वडोदरा,पावगढ-चंपानेर-3 - - काल दिवसभर झालेल्या पायपीटीने अशी काही गाढ झोप लागली जसे काही आम्हीं घोडे विकून आलो आहोत. मी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून व पक्षीदर्शनात दंगलो.आकाश निरभ्र आणी निळेशार होते. दिग्गज कवींच्या निळ्या रंगावरील कवीता मराठी आठवू लागल्या.


शास्त्रीय संगीत/ वाद्यांची ओळख - उत्तम माहितीपट

लेखक: चौकस२१२ | प्रसिद्ध:
शास्त्रीय संगीतातील एक मात्तबर कलाकार सॊ विणा सहस्र्बुद्धे यांच्यावरील एक उत्तम माहितीपट नक्की पाहावा असा https://www.youtube.com/watch?v=oUPPv83s_cU त्याचे वडील म्हणजे पंडित शंकर श्रीकांत बोडस जे कानपुर स्तिथ होते ते मुळात सांगलीचे होते त्याना कानपुर ला पाठवले ते लाहोर ला १९०१ साली स्थापित केलेल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विंष्णू दिगंबर पलुस्कर यांनी . ( गंमत बघा " मौसिकी / संगीत हे आमच्या धर्मात बसत नाही- ते हराम आहे" म्हणणाऱ्या समाजाचे बलस्थान असलेल्या लाहोर मध्ये अशी संगीताच्या प्रसाराची सुरवात झाली ..


मेथी के शर्ले

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले. मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात. अ साहित्य एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत. तीन मोठे बटाटे आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस