कलादालन

पुलावरचा न्हावी

Primary tabs

नमनाचे तेलः माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते. तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच. इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली. आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून. अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार. त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला शिकवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रयोग सुरू असतो. (हे वाचून इथल्या कुणाला हुक्की आली तर तेही सामिल होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य!) मीही त्या प्रयोगात नवशिक्या म्हणून सामिल झालो. चुकत माकत काही कागद आणि बरेच रंग खराब केले. अजून करतोच आहे. मी रंगवलेले एक चित्र येथे देण्याचे धाडस करतो आहे. काही चुकलंय असं वाटलं तर सांगा. काही बरं वाटलं तर श्रेय 'मास्टरजींना'. :) आता चित्र : Image removed. शीर्षक : पुलावरचा न्हावी (द बार्बर ऑन द ब्रिज) माध्यम : वॉटरकलर (जलरंग) आकार : ६ इंच * ४ इंच अंदाजे. चित्राबद्दल थोडेसे : दररोज ऑफिसला जाताना मला नल्लाकुंटा नाल्यावरील पुलाच्या फुटपाथवर हा न्हावी आपले दुकान मांडून बसलेला दिसतो. हे दृष्य मला कालौघातील दोन बिंदूंना जोडणार्‍या पुलासारखं दिसतं. म्हणून चित्राचं नाव 'न्हाव्याचा पूल' किंवा 'द ब्रिज ऑफ द बार्बर' असं द्यावं काय? असाही विचार मनात डोकावतो. (स्पष्टीकरण : जागतिक नकाशावरच्या आजच्या शहरात अजूनही साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या खेड्यात पिंपळाच्या पारावर हजामतीचं दुकान मांडणारे न्हावी दिसतात. )
भाग्यश्री

सहीए हे!! न्हाव्याचा हात, वस्तरा, त्या शेजारच्या माणसाची दाढी वगैरे भारी जमलेय !!
कसं शिकलात हो? मलाही शिकायचेय.. जमतच नाही.. एकदा वॉटरकलर ट्राय केले, लहान मुलाने काहीतरी फासून ठेवलंय असं वाटण्याइतपत वाईट दिसत होते...

छोटा डॉन

हे हे भाग्यश्री, तु म्हणतेस तसेच आहे माझे.
लहानपणी चित्रकला अतिप्रिय होती, बर्‍यापैकी चांगली जमायची सुद्धा, मग काळाच्या ओघात सर्व हरवुन गेले ...

आता नोकरीला लागल्यावर आतल्या चित्रकारने पुन्हा एकदा उचल खाल्ली, मस्त फॉर्ममध्ये १५००-२००० रुपयांचे चित्रकलेचे लै भारी व ऑथेंटिक सामान आणले, पण आता काढलेल्या चित्रांकडे बघु वाटत नाही. तसे मुड येईल तसे चालुच असते ... ;)

बाकी विसुनाना, चित्र अगदीच उत्तम आहे.
रंगसंगती व ब्रशचे फटकारे एकदम उच्च आहेत.
अजुन येऊद्यात असेच, आम्हालाही प्रेरणा मिळेल कदाचित ...

------
( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री

>>( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन

अच्छा !! आत्ता कळले .. म्हणुन गणपतीचे स्वेटर काढायच्या मागे लागले होते का ?

असो .. हा प्रासंगिक विनोद झाला.

बाकी चित्र छान जमले आहे, एलिमेंट्री ड्रॉइंगच्या परिक्षांची आठवण झाली. प्रकाशछटांचा बॅलॅन्स संभाळणे छान जमलेय.

मैत्र

जलरंग हे सगळ्यात तरल आणि अवघड माध्यम आहे.
आकृतींच्या नेमके पणापेक्षा सूचक गोष्टी, रंगसंगती, छायाप्रकाशाचा वापर, छटा, आणि ओले रंग एकमेकांत अर्धवट मिसळून निर्माण केलेला आभास असं वेगळंच आहे.
तुम्ही लिहिलेल्या पार्श्वभूमीप्रमाणे मस्तच जमलंय!!

अवांतरः दुर्दैवाने हैदराबाद सोडून परत आल्याने आता येता येणार नाही. नाहीतर नक्की आलो असतो शिकायला...
तुमच्या तयारीला आणि छंदाला अनेक शुभेच्छा! अशीच वेगवेगळी चित्रं करून इथे आमच्या सोबत शेअर करा ( मराठी ?)...

अनिल हटेला

छान प्रयत्न आहे !!!

येउ द्यात अजुनही !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु

वा खुपच छान चित्र आहे. अजुन काढत राहा.

नितिन थत्ते

खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसोबा खेचर

खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास.

हेच बोल्तो..

तात्या.

धनंजय

तपशील न देता तपशिलांचा भास घडवणे हे जलचित्रांचे खास हुन्नर.

सुंदर.

सहज

नवशिक्यांकडून असे चित्र करवुन घेतले म्हणजे तुमचे मास्टरजी महान!

त्यांना विचारुन त्यांच्या काही कलाकृती देखील येउ दे.

यावरुन आठवले रामदास सर तुम्ही शार्दुल कदम यांना भेटुन एकदा लिहायचा आग्रह करा. व काही चित्रही दाखवा अजुन.

नरेश_

तुम्हाला व तुमच्या मास्टरजींना उभे राहून मानवंदना देतो :-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

अवलिया

वा! :)

--अवलिया

चतुरंग

जलरंग वापरायला कठीण. तैलरंगावर एका ब्रशच्या फटकार्‍यावर दुसरा मारता येतो पण इथे शक्यतो एकदाच, नाहीतर पोत बिघडतो.
पांढर्‍या रंगासाठी कागदाचाच यथोचित वापर करता येणे हे जलरंगातले आणखी एक वैशिष्ठ्य तुम्ही चांगले साधले आहे.
छायाप्रकाशाचा खेळ सुंदर! अजून येऊदेत. :)

चतुरंग

कणण्याकुमारीला गेल्तो तव्हा ज्योतिषाने आमच भवितव्य उज्वल असुन आमाला लई पैशे भेटतीन आस सांगितलय. आमी बी आता नव्या पुलाव पंचांग घेउन बसाव म्हंतो.
From समाज
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

एकलव्य

चित्र अगदी मनात घर करून राहिले आहे. - अतिसुंदर!

विसुनाना

आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार.
तसेच आपल्या भावना मास्टरजींपर्यंत पोचवीन.

बबलु

मस्तच पेंटींग.
मी माझ्या ल्यापटॉप वर desktop background म्हणून लावून पण टाकला. :) चालेल ना ?

....बबलु

शारंगरव

या चित्रा सठी आपण निवडलेले माध्यम (वॉटर कलर) हे तसे अवघड माध्यम आहे.
आपले चित्र खूपच छान आहे.
- शारंगरव

चित्रा

चित्र आवडले. एसीसी लिहीलेली पाटी ही रंगामुळे अधिक नजरेत भरते आहे, पण ते वस्तुस्थितीप्रमाणे असावे. न्हाव्याचे दुकान मात्र एकदम खास. चित्र छानच जमले आहे.