Skip to main content

एग बिर्याणी

लेखक मितालि यांनी सोमवार, 13/04/2009 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
एग बिर्याणी वरळी मुम्बईला कुठेतरी एका लहानश्या होटेल मधे ५५ रु. ला ही एग बिर्याणि उत्कृष्ट मिळते. तशी बनवण्याचा प्रयत्न केलाय. छान बनली म्हणुन पाककृती देतेय.. पाककृती: २ उकडलेली अंडी चिरून दोन दोन तुकडे करून घ्या. १ वाटी बासमती तान्दळाचा जीरे, शाहिजीरे, लवंग, मिरी, दालचीनी, मसाला वेलची, साधी वेलची, तमालपत्र, हळद, मीठ , तुप घालून मोकळा भात शिजवून घ्या. १ मोठा कांदा बारीक़ चिरून तेलावर परतून घ्या. तेलाचा सढळ हस्ते वापर करा. त्यात आले लसून पेस्ट व १ वाटी टोमेटो घालून परता. नंतर त्यात मिर्ची पावडर, बिर्याणी मसाला, धणेजिरे पुड आणि हळद घालून परता. पाणी घालून उकळी आणा. ही ग्रेवी थोडीशी तिखट व दाटसर बनवा. कोथिंबीर चिरून घाला. आता या ग्रेवीवर चिरलेली अंडी घाला व हलकेच मिक्स करा. या ग्रेवी वर भाताचा थर द्या आणि कोथिंबीर पसरा. बिर्याणी ला थोडावेळ मंद आचेवर शिजू दया.

वाचने 9030
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

४ स्टेप मध्ये सोप्या पद्धतीने लिहलेली पाकृ आवडली. >>>"तेलाचा सढळ हस्ते वापर करा. त्यात आले लसून पेस्ट व १ वाटी टोमेटो घालून परता" यामूळे नक्कीच छान लागत असणार! चकली http://chakali.blogspot.com

सर्व भगिनीना विनंती येथे जरा ऑनलाईन कुकिंग क्लास चालू करा... वरील सोपी पाककृती पाहून परत एकदा किचन मध्ये लढाईला जावे असे वाटत आहे मला ;)

दिल्लि दरबार हि डिश मुम्बै ल नक्कि कुठल्या होटेलत मिळ्ते??? आता ३ वर्षानि मुम्बै ल जायचा योग आला आहे.त्या मुळे घरि ट्राय करण्या पे़क्षा होटेलातच जाउन खाउ.

व्वा.. मस्तच दिसतेय ग बिर्याणी आणि पाकृ सोपी दिसते आहे, नक्की करणार.. स्वाती

परवा ही बिर्याणी केली होती. फक्त मी शाकाहारी असल्यामुळे अंडी घातली नव्हती आणि नारळाच्या दुधात तांदूळ शिजवले होते. अगदी हॉटेलमधल्या बिर्याणीसारखी लागत होती. नवर्र्याने पण नावाजली. - सुप्रिया देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.