Skip to main content

आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 27/08/2021 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.

वाचने 64490
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

फक्तं एका आर्थिक घडामोडींच्या धाग्यांवर एका विद्वानाने विशिष्ट पध्दतीच्या एकतर्फी घडामोडींचं पुन्हापुन्हा दिल्या व वरून मी फक्त जगातील घडामोडींची माहिती देत आहे त्यावरून काहीही अनुमान माझे लिखाण वाचून काढू नये असे काहीतरी बरळले होते... अर्थात तो पर्यंत त्यांचा भाता फक्त विनोदाच्या बाणांनी भरलेला आहे आणीखी कोणत्याही नाहीं हे मला माहीत नव्हते त्यामूळे मी त्यांचे प्रतिसाद त्याआधी कधीच विनोद म्हणून वाचत न्हवतो ही माझीही चूकच झाली होती. असो, धाग्याला शुभेच्छा.

मालदीवमधील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा करार गुरुवारी २६ ऑगस्ट २०२१ रोजी माले येथे झाला. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट (जीएमसीपी) मध्ये ६.७४ किमी लांबीचा पूल माले आणि जवळच्या बेटांदरम्यान कॉजवे लिंक असेल. भारतीय बांधकाम कंपनी AFCONS ला प्रकल्प पूर्ण करण्याचे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या माले भेटीपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय सल्लामसलतीचा परिणाम आहे.

मोरारजी देसाई संस्था योग (MDNIY), आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि सौदी सरकार यांच्या योग विषयक, संशोधन आणि शिक्षण देण्यासाठी करार केला गेला आहे.

खरं तर ह्या चर्चा चालू घडामोडी धाग्यातच व्हायला हव्यात. पण दिवस ऊजाडला कि मोदी, फडणवीस यांची आरती गायला सुरूवात करायची. आघाडी सरकार वाईट आहे म्हणून आदळ आपट करायची ( ह्यात फडणवीसना घरी बसवल्याचा राग जास्त असतो), कुणी मुद्दा खोडला का त्याला वयक्तिक बोलायचं, मुद्द्याला ऊत्तर नसेल तर पळ काढायचा. अक्षरष: ऊच्छाद मांडलाय भाजप समर्थकानी मिपावर. ह्या धाग्याच्या निमीत्ताने काहीतरी माहीती मिळेल. नाहीतर ईथेही ठाकरे सरकार विरूध्दची जळजळ व्यक्त करायला भक्तगण येतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

 वाईट वाटले. पण काय करणार तथाकथित शिक्षित लोकांना जर गेल्या 12 वर्षातील प्रगति दिसत नाही तर आम्ही काय करू.  (20 दिवसांपासून लपटप चालत नव्हता. पहिला प्रतिसाद तुम्हाला समर्पित करतो).  बाकी 36 देशांनी आमच्या अडाणी प्रधानमंत्रीला सर्वोच्च पुरस्कार दिले त्यातच सर्वकाही आले. 


धागा उपक्रम स्तुत्य आहे.. फक्त धाग्याचे नियम सान्गा.. नाहीतर सामनाछाप सदस्य गोन्धळ घालतील.. माझ्याकडून त्यान्ना उत्तर नाही..

In reply to by रामदास२९

इथे ती शक्यता फार कमी आहे, कारण इथे माहिती घेऊन लिहावे लागेल आणि अकलेचे दिवाळे वाजलेले असलेल्यांना वाचता येत नाही आणि वाचले तर कळ्त त्याहून नाही.

https://www.news18.com/news/india/india-welcome-to-finish-projects-in-a… तालीबान भारताला अपुरे प्रोजेक्ट पुरे करु शकतात असे बोलतो आहे. एक तर तिथे परीस्थीती अगदीच बिन भरवश्याची झाली आहे. त्यात भारताने केलीली कित्येक कोटी रुपयांची गुंतवणुक आता अडकली आहे. त्यात अजुन जोखीम घेणे कितपत योग्य आहे? हाच तालीबान प्रोजेक्ट संपल्यावर भारतावर उलटणार नाही याची काय शाश्वती ? माझ्या मते भारताने तोच पैसा घरी वापरावा ...

In reply to by सुक्या

कुठलाही देश मदत फुकटात करत नसतो. जर तालिबान ला हे प्रोजेक्ट पूर्ण करून हवे असतील तर भारताला काय मिळेल? खाणी, उत्खनन वगैरे मध्ये हिस्सा मिळेल का? पाकिस्तान ला चाप लावण्यात मदत मिळेल का? आपला मिलिटरी बेस वगैरे साठी परमिशन मिळेल का? नसेल तर सरळ ही कर्जे राईट ऑफ करून गप्प बसावे. अर्थात चीन काय करतोय हे ही पहायला हवे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

अजुनपर्यंत तरी सारे गूडविल म्हणुन चालु होते. त्यात भारताचे घनी सर्कार बरोबर सलोख्याचे संबंध होते याचा तालीबानींना राग आहे .. म्हणुन म्हणतो या लोकांवर विश्वास कसा ठेवावा. त्यात एयर इंडिया च्या विमान अपहरणात याच तालीबाणी लोकांनी अतीरेक्यांची मदत केली होती हे विसरता कामा नये ..

In reply to by सुक्या

आपला देश गरीब असताना आणखीन गरीब देशांत जाऊन नस्ते प्रकल्प का बरे राबवावे ? अमेरिकन मूर्ख पणा पासून भारतीय सरकारने धडा घ्यायला हवा होता. जी लायब्रेरी भारताने बांधली होती त्याला तालिबान ने आग लावली आणि जलऊर्जा प्रकल्प आता तालिबान वापरत आहे. तालिबानी मंडळींची एक खासियत म्हणजे, बाहेरून एक आणि आतून एक असा प्रकार नाही. ते प्रकल्प वगैरे पूर्ण करण्याची वाट पाहणार नाहीत. आधीच भारताला शिव्या देतील, काही भारतीय मंडळींचे शिरकाण करतील आणि वरून "प्रकल्प पूर्ण करा " असे ठणकावून सांगतील. म्लेंछ मंडळींशी कसलाही संबंध ठेवू नये. मदत तर अजिबात करू नये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अफगाणिस्तान मध्ये गुंतवणूक ही मनमोहन सरकार च्या काळा पासून चालू आहे. आणि ह्यात काहीही चुकीचे वाटत नाही. शेजारील देशात गुंतवणूक ही करायलाच पाहिजे. अफगाणिस्तान च्या गुंतवणुकीतून भारताला काहीही आर्थिक फायदा होणार नाही परंतु अफगाणिस्तान हा पाकिस्तान चा शेजारी आहे आणि त्या दोन्ही देशाचे संबंध चंगले नव्हते त्या दृष्टिकोनातूनच भारताने गुंतवणूक केली असणार. आणि महत्त्वाचे म्हणजे आपण गुंतवणूक केली त्यावेळी अफगाण सरकार हे भारताच्या बाजूचे होते तालिबान सत्तेत असे पर्यंत भारत गुंतवणूक करण्याची शक्यता नाही. श्रीलंकेतील Hambanthota बंदर विकसित करायला लंकेने सर्वात आधी भारताला विचरले होते परंतु आपण नकार दिला आणि तिथे अत्ता चीन येऊन बसला आहे, सुरक्षेच्यादृष्टीने भारता साठी डोकेदुखी झाली आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे आहे तर त्याला जे पर्याय आहेत ते महामूर्ख आहेत.

In reply to by साहना

पाकिस्तान मध्ये भारत विरोधी आतंकी ठिकण्यावर लावण्यास जर तालिबान भाडे तत्वावर मदत करत असेल तर काय वाईट. बाकी शत्रूचा शेजारी स्वाभाविक मित्र असतो. 


भारत आणि मॉरिशसने २०२१ मध्ये व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार (सीईसीपीए) करार केला आहे. हा भारताने केलेला अशा पद्धतीचा पहिला व्यापार करार आहे. या करारासाठी दोन्ही बाजूंनी त्यांच्या अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि भारत-मॉरिशस CECPA एप्रिल २०२१ पासून लागू झाला आहे. यामध्ये भारताला ३१० वस्तूंची निर्यात करता येईल. यामध्ये अन्न सामग्री आणि पेये, कृषी उत्पादने, कापड आणि, धातू , इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. प्लास्टिक आणि रसायने , लाकूड आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे. सेवांच्या व्यापाराच्या संदर्भात, भारतीय सेवा प्रदात्यांना
  1. व्यावसायिक सेवा,
  2. संगणक संबंधित सेवा,
  3. संशोधन आणि विकास,
  4. इतर व्यवसाय सेवा,
  5. दूरसंचार,
  6. बांधकाम,
  7. वितरण,
  8. शिक्षण,
  9. पर्यावरण,
  10. आर्थिक,
  11. पर्यटन
यासारख्या व्यापक सेवा क्षेत्रांमधून अनेक उपक्षेत्रांमध्ये प्रवेश असेल.

भारत आणि ईयु मध्ये व्यापारी वाटाघाटी २००७ मध्ये ईयु च्या पुढाकाराने सुरू झाल्या होत्या. २०१३ मध्ये त्या भारताने स्थगित केल्या होत्या. या वाटाघाटी मोदी सरकारने परत सुरू केल्या आहेत. तीन संतुलित आणि सर्वसमावेशक व्यापार-संबंधी करारांवर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. भारताने कोविड लसींसाठी पेटंट संरक्षण माफ करण्याची मागणी ठेवली आहे.

महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स आता टॉर्पेडोंचे उत्पादन करणार आहे. भारतीय नौदलाने खाजगी क्षेत्राशी असलेला १३४९.९५ कोटी रुपयांचा हा पहिला मोठा करार आहे. या करारान्वये महिंद्रा अँटी सबमरीन वॉरफेअर डिफेन्स सूट प्रणाली पुरवणार आहे. यामुळे भारताला आयातीवर अवलंबून रहावे लागणार नाही. तसेच यातून पुढे जाऊन निर्यातीच्या संधी मिळतील.

In reply to by कंजूस

अफगाणिस्तानात तांबे आणि लिथियम हे फार महत्त्वाचे धातू मोठ्या प्रमाणावर आहेत. हे दोन्ही धातू डिजिटायझेशन आणि विजेच्या बॅटरी निर्मितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. (बाकी अफू आणि रत्ने याचा भारताला फारसा उपयोग नाही) हे माहिती असल्यामुळे तेथे कोणतेही सरकार आले तरी ते सरकार चीनच्या हातचे बाहुले बनू नये आणि या दोन महत्त्वाच्या धातूंवर चीनची मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी भारत प्रयत्नशील आहे आणि हे केवळ विद्यमान सरकार करत आहे असे नाही तर श्री मनमोहन सिंह सरकारने चालू केलेले आहे. चीनने आफ्रिकेत आपली अशी मक्तेदारी निर्माण केलेली आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय धोरणे सुदैवाने पक्ष निरपेक्ष राहिलेली आहेत. काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने हे श्री मोदी यांचे अपयश समजून अनाठायी प्रतिसाद देत आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे लागते आहे.

In reply to by सुबोध खरे

काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने हे श्री मोदी यांचे अपयश समजून अनाठायी प्रतिसाद देत आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे लागते आहे. ---एक हजार टक्के सहमत.

अमेरिका-भारत संरक्षण व्यापार आणि संरक्षण सहकार्याचे तीन पायाभूत करार
  1. लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट (LEMOA),
  2. कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट (COMCASA)
  3. औद्योगिक सुरक्षा करार (ISA)
या सर्व करारात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात उच्च तंत्रज्ञान सहकार्य करून नोकर्‍या निर्माण केल्या जातील असे म्हंटले आहे. मूलभूत संरक्षण करार केल्या नंतर २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून नियुक्त केले. या पदनामानुसार, २०१८ मध्ये, भारताला सामरिक व्यापार प्राधिकरण टियर १ दर्जा देण्यात आला आहे. ज्यामुळे भारताला नियंत्रित केलेल्या लष्करी आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीमध्ये परवाना-मुक्त प्रवेश मिळाला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्याची निर्मिती भारतात केली जाते आहे. हे साहित्य भारतातून निर्यात केले जाते. असे संरक्षण आणि तंत्रज्ञान विषयक करार गेली किमान २५ वर्षे रोखून धरले गेले होते. भारतीय साम्यवादी पक्षांनी वेळोवेळी हे करार होऊ नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. हे करार झाल्यावर ते कसे वाईट आहेत. यावर ही डिसिन्फॉर्मेशन मोहिना राबवल्या गेला आहेत. पण २०१४ नंतर साम्यवादी पक्ष भारतीय राजकारणातून बाद होत गेले आणि भारताचा रोख मोदी सरकारने अमेरिकेकडे वळवल्यावर या करारांचा मार्ग मोकळा होत गेला. भारत आणि अमेरिकेने संवेदनशील उपग्रह डेटा सामायिक करण्याच्या लष्करी करारावरही स्वाक्षरी केली आहे. क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर लक्ष्यांना अचूकतेने वेध घेण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते.

चांगला उपक्रम! आफ्रिका खंडाकडे आजही खूप मोठ्या प्रमाणावर खनिज व अन्य नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असल्याने, आफ्रिकेतील मोझांबिक आणि दक्षिण सुदान देशांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्रामध्ये भारताने ७०० कोटी डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक केली आहे. २२ सप्टेंबर २०२० म्हणजे जवळपास वर्षभरापुर्वी भारत आफ्रिका सहकार्य या विषयावर (कोविड परिस्थितीमुळे) डिजिटल परिषद झाली होती त्याला आफ्रिकन देशांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चिनच्या आधुनिक वसाहतवादाने त्रस्त झालेले अनेक आफ्रिकन देश भारताकडे एक प्रामाणिक आणि दीर्घकाळचा भरवशाचा सहकारी म्हणुन पहात आहेत ही प्रशंसनीय बाब आहे. माध्यमांकडुन ह्या परिषदेची आणि तिच्या फलीतांची फारशी दखल घेतली जात नसल्याने गेल्या ११ महिन्यांत किती विषयांवर ह्या देशांशी बोलणी/वाटाघाटी झाल्या आणि त्यातुन काही करार झाले/होण्याच्या मार्गावर आहेत ह्याची माहितीही वाचण्यात रस आहे. धन्यवाद.

इस्राईल बरोबर दोन संरक्षण सामग्री करार झाले आहेत असे ऐकुन आहे. जाहीरपणे याची माहीती नसल्यामुळे जास्त काही माहीत नाही. कदाचीत संरक्षण सामग्री करार असल्यामुळे गोपणीय असावे. एका "एशियन" देशाबरोबर झालेला करार इतकेच त्यांनी सांगीतले आहे. १. २०० मिलीयन डॉलर चे स्पाईस बाँब खरेदी करार. हाच स्पाईस बाँब बालकोट एयर स्ट्राईक करताना वापरला होता. २. इस्राईलच्या टेवर एक्स ९५ रायफल आता भरतात बनवल्या जातील. त्याचे उत्पादन कुठे करणार आहेत हे अजुन गुल्दस्त्त्यात आहे. त्याबरोबर भारातीय कंपण्यांना काही संरक्षण सामग्री उत्पादन करण्याचे करार झाले आहेत .. १. एच ए एल बरोबर ८४ नवे तेजस लढाउ विमान उत्पादनाचे काम. हा करार जवळ्पास ४८००० कोटी रुपयांचा आहे. २. भारत इलेक्ट्रटीक बरोबर १००० कोटी रुपयांचा करार. यात नवीन संदेशवहन प्रणाली विकत घेणार आहेत. ३. डीआरडीओ १२० अर्जुन रणगाडे बनवणार आहे. हा करार जवळ्पास ९००० कोटी रुपयांचा आहे.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चीनच्या नॅशनल केमिकल कॉर्प कडून युरोपची सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक REC ग्रुप घेणार आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

मीहिती देत राहा म्हणजे धागा वाचनीय होईल. कोणत्या सरकारने काय घाण केली वगैरे बाजूला ठेवून प्रतिसाद लिहित जा. झालं ते झालं किंवा ते पक्ष निवडणुकीसाठी प्रचार म्हणून उपयोग करतील ते सोडून द्या. आपल्या मिपाकर मराठी वाचकांना माहिती मिळावी हाच हेतू ठेवा सर्वानी म्हणजे मिपा समृद्ध होईल. वेळ मिळेल तसे लेख वाचत जाऊ. सर्वच जण इंडिया टुडे सारखी साप्ताहिके वाचत नाहीत. ( हिंदीतही निघते) पण मराठीत सोपे करून इथे देत जा. चाःगला धागा चांगलाच राहू द्या. दुसरं म्हणजे धागा लांबला की भाग करा.

आज देशात शिक्षणाचा बाजार निर्माण झाला आहे . बारावी ला ९०% पुढं मार्क मिळून सुद्धा मुलांना मेडिकल ला सहज प्रवेश मिळत नाही. काँग्रेस सरकार नी निर्माण केलेल्या मेडिकल कॉलेज मध्ये bjp सरकार नी काय भर घातली. सात वर्षात किती मेडिकल कॉलेज bjp sarkar निर्माण केली? मुलांना चीन ,रशिया मध्ये जावं लागत आहे. बाजारू मेडिकल शिक्षण मुळे अत्यंत हुशार डॉक्टर भारतात उपलब्ध च नाहीत. किती नवीन IIT मोदी सरकार नी निर्माण केल्या? कोटा सारखे class च बाजार देशभर चालू आहे उत्तम दर्जा चे इंजिनिअर भारतात तयार च होत नाहीत. जे आहेत ते शिक्षित हमाल आहेत काही कामाचे नाहीत. सर्व सरकारी संपत्ती विकून फालतू योजना bjp आखत आहे आणि निनाद सारखे भक्त त्याची जाहिरात करत आहे.

In reply to by Rajesh188

राजेश काका तुम्हि दिलेल्या प्रतिसादात कुठला आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोड दिसत नाहि. उगाच जिकडे तिकडे तुमच्या मोदि आणि bjp द्वेषाची घाण पसरवु नका.

In reply to by Rajesh188

करणारे लेखच वेगळे लिहा राजेश. पेप्रातही असे लेख येतात. समीक्षा/टीका करणे वाईट नाही. पण एक विषय घेऊन मालिकाच काढा.

In reply to by कंजूस

ही विनंती मी मीपाला आधीच केली होती बघुयात केंव्हा कार्यवाही होते ते

In reply to by Rajesh188

२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मेडिकल कॉलेजेसची संख्या तब्बल १०२% ने वाढून २०१४ मधील ३८७ वरून २०२४ मध्ये ७८० वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे MBBS सीट्समध्येही १३०% वाढ झाली असून २०१४ मधील ५१,३४८ जागा आता १,१८,१३७ वर पोहोचल्या आहेत. ही प्रगती केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून देशातील आरोग्य व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देणारी ठरते. अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे भविष्यात डॉक्टरांची उपलब्धता वाढेल आणि जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.  (भारतातील शिक्षण उत्तम आहे म्हणून अमेरिकेत डिमांड आहे) 


In reply to by विवेकपटाईत

वास्तव काही अजून असू शकतं. खालील तक्त्यावरून पाहता येईल. 

क्रमांक १. - भारतात उपलब्ध एमबीबीएसच्या एकूण सीट (नवीन आकडे) Screenshot-20260811-124654 

क्रमांक २. - दरवर्षी इच्छुक पोरे (हवशे गवशे सोडून देऊ आपण चिंता नको) Screenshot 20260811 141454 

क्रमांक ३ - मॅनेजमेंट कोटा फी आणि त्यातील होत आलेले बदल Screenshot 20260811 124852 

क्रमांक ४ - मॅनेजमेंट कोटा अतिशयोक्त वाटत असेल तर ही प्रायव्हेट कॉलेज मधील मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांनी भरण्याची फी आणि त्याचे मागील दहा वर्षातील बदल Screenshot 20260811 124852 

क्रमांक ५ - दरवर्षी बाहेर देशात एमबीबीएस करायला जाणार मुलांची संख्या आणि त्यात १० वर्षात आलेला बदल , पुढील प्रतिसादात माझे प्रतिपादन मांडतोScreenshot 20260811 125145


In reply to by वृषभ खोंडे

<a href="https://ibb.co/4BvPxcf"><img src="https://i.ibb.co/PBXw8RY/Screenshot-20260811-124448.png" alt="Screenshot 20260811 124448" border="0"></a>


हुशार डॉ उपलब्ध नाहीत ? काही पुरावे. काय बरळतो हा माणूस. याच्यावर अंकुश लावा कुणीतरी. राजकीय धागाच झेपेल तुम्हाला इकडे चिकलफेक सुरू नका करू. दिवसभर खरडत बसायचं काहीतरी. लोक फालतू गोष्टींवरून चिडले की मजा येते का हो तुम्हाला. दाखवून द्या एकदा सो कॉल्ड चांगल्या वैद्याला कारण चांगले डॉ तर नाहीतच ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्हाला माहीत तरी आहे का रशिया आणि इतर देशात जे शिकून येतात त्यांची क्वालिटी काय असते ते. पदव्युत्तर नीट पास होत नाहीत जन्मजन्म. D.ed कॉलेज सारखे मेडिकल कॉलेज काढून यांना भारतात शिकवून लोकांच्या जीवाशी खेलायच का आता. काय बोलताय राव. ते bjp च काहीच देणंघेणं नाही मला. पण तुम्ही रोज नीट वेळेवर गोळ्या घेऊन टायपायला बसत जा राव. नाहीतर आम्हाला गोळ्या चालू होतील तुमचं फालतू वाचून.

In reply to by शलभ

मला वाटते, आयडीवर नाही तर, नको असलेल्या प्रतिसादांवर कारवाई केली पाहिजे. "धाग्याचे हीत सांभाळण्यासाठी" किंवा "अप्रस्तुत टिपण्णी" असा नवा नियम करून अंमलात आणला गेला पाहिजे व प्रशासकांचा निर्णय अंतीम मानला गेला पाहिजे. असे झाले तरच तरच, गांभिर्याने प्रतिसाद देणारे व वाचणारे या धाग्यावर येत राहतील.

In reply to by शाम भागवत

नको असलेल्या प्रतिसादांवर कारवाई करायला संपादकांचा खूप वेळ जाणार. त्यापेक्षा आयडीवर कारवाई कमी वेळ घेईल. तसही मी आधी आयडी बघतो मग प्रतिसाद वाचतो. पण गूल्लु दादा सारखा आयडी वैतागला म्हन्जे संपादकांनी बघितले पाहिजे इकडे.

In reply to by गुल्लू दादा

यांच्या मेंदूवर उपचार करू शकेल असा एकही हुशार डॉक्टर भारतात नाही.

In reply to by गुल्लू दादा

राजेशराव मानलं बॉ तुम्हाला. गुल्लूदादांचा संयम पण तुम्ही संपवू शकलात. प्रशासक हो, नको असलेले प्रतिसाद कृपया काढून टाका.

In reply to by शाम भागवत

प्रशासक हो, नको असलेले प्रतिसाद कृपया काढून टाका.

कुणाला नको असलेले ?

. प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;)

In reply to by सुरिया

कुणाला नको असलेले ? . प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;)

😀

त्या प्रतिसादात "प्रशासक हो" ह्यालाच जास्त महत्व होतं. मला राजेशभौंचा त्रास नाही होतं. त्यामुळे पुढचे वाक्य मी सोडून इतरांसाठी होते.

😂

१. त्यांनी त्यांचाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलेला असेल तर लागलीच पुढे जाता येतं. २. फारशी महत्वाची चर्चा चालू नसताना त्यांच्या आलेल्या पोस्ट वरवर वाचायला मजा येते. ३. मात्र चांगली चर्चा चालू असताना त्यांचा प्रतिसाद आल्यास तो खटकतो. पण इथेच आपली परिक्षा आहे हे लक्षात आल्याने तो प्रतिसाद वगळून पुढे जाता येत किंवा प्रतिसाद वाचूनही शांत रहावयाची प्रॅक्टीस करता येते.

🤣


In reply to by शाम भागवत

@शामकाका हसणे मस्त आहे तुमचे पण, साधा प्रश्न होता तुम्हाला, कारण 'नको असलेले' असा शब्द तुम्ही वापरलात. सध्या तुम्ही म्हणताय तुम्हाला त्रास नाहि होत मग इतरासाठी हा पुढाकार का? . पूर्ण मिपासाठीच ते ११८ प्रतिसाद हानिकारक आहेत का?

In reply to by सुरिया

अहो, राजेशभौंचा एकच अजेंडा आहे. असंतोष पसरावयाचा. बस्स. मग विषय कोणताही असो. ते त्यात माहीर आहेत. आत्तापर्यंत राजेशभौंच्या प्रतिसादाबद्दल बर्‍याच जणांनी लिहिलंय. त्यावरून "नको असलेले" म्हणजे कोणते हे कळू शकते.

In reply to by शाम भागवत

काही तरीच काय. असंतोष पसरवणे हा माझा हेतू नाही.मला काय इथे बंडखोर थोडीच निर्माण करायचे आहेत. जे वाटत ते मी लिहतो.त्याला चांदी,सोन्याचे वर्ख लावून आकर्षक वाटलं असे काही लिहीत नाही. त्या मुळे माझे लिखाण खूप कमी लोकांना आवडते. असंतोष पसरवणे ह्या हेतू नी कोणताच प्रतिसाद दिला जात नाही.

In reply to by Rajesh188

तूम्ही जसे आहात तसेच व्यक्त होत आहात इतर लोक जास्त शांत असतील तर तो तुमचा दोष न्हवे मला तर कधिच तूम्ही असंतोष पसरविणारे वाटले नाही उलट तुमच्यामुळे मी तिसरी चौथीत जसा होतो त्याच आठवणी ताज्या होतात _/\_

In reply to by गॉडजिला

माझे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील तसे असतात असे तुम्हाला वाटत. हे वाचून तुमची थोडी जीव वाटली. समाजात असे तुमच्या सारखे स्वतः ला अती हुशार समजणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे तुम्ही एकटे नाही आहात . आयुष्यात कधीच bat हातात न घेतलेले आणि फक्त टीव्ही वर क्रिकेट बगून स्वतःला क्रिकेट मधील जाणकार समजणारी मंडळी. सचिन,कपिल,द्रविड आणि जगातील बाकी दिग्गज मंडळी च्या पण चुका काढत असतात. आणि सल्ले पण देत असतात त्यांना. असतात अशी लोक तुमच्या सारखी मी समजू शकतो. राहुलजी म्हणतात मोदी ना काही कळत नाही. मोदी जी म्हणतात राहुलजी ना ज्ञान नाही. राणे आणि bjp वाले म्हणतात उद्धव जी मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे नाहीत. आणि उद्धवजी देशातील सर्वात अती उत्तम मुख्यमंत्री आहेत असे आहावल पण येतात. मी मात्र जमिनीवर आहे मला जास्त कळत असला फालतू आत्मविश्वास मला नाही. पण खूप लोकांना असतो त्या मध्ये तुम्ही एक. पण निराश होण्याचे काही कारण नाही अशा खूप लोकांची संख्या समाजात आहे तुम्ही एकटे नाही आहात.

In reply to by Rajesh188

ज्यांना आपले प्रतिसाद वाचुन ते तिसरी चौथीत जसे होते त्या आठवणी ताज्या होतात. आणि अशा सर्व लोकांच्या आनंदाच्या क्षणासाठी तुम्ही लिहते राहणे मला फार फार आवश्यक वाटते.
माझे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील तसे असतात असे तुम्हाला वाटत. हे वाचून तुमची थोडी जीव वाटली.
काहीतरी तुम्ही गोंधळ केलाय समजुन घेन्यात तो माझाहि होत असे तिसरी चौथीत… असो... मी तुमचे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील असे असतात हे कुठेच म्हटलेले नाहि हो _/\_

In reply to by गॉडजिला

मी फक्त तुमचे महान अभ्यासु प्रतिसाद वाचुन आम्हाला आमच्याबद्दल काय वाटते ते विशद केलयं. परत एक्दा सॉरि जर का तुम्हाला मी तुमचे प्रतिसाद तिसरी चौथितील मुलाच्या बुध्दीने दिले आसतात असे मी म्हटलो असं वाटत असेल तर तुम्ही तसे आजिबात वाटुन घेउ नका व जसे आहात तसेच लिहीत रहा खुप छान वाटते ते वाचुन. का वाटते तेन्वर स्पश्ट केले आहेच.

In reply to by Rajesh188

असंतोष पसरवणे ह्या हेतू नी कोणताच प्रतिसाद दिला जात नाही.
तुमचा हेतू तसा नाही पण तुमचा स्वभाव तसा बनला आहे असे वाटते. म्हणजे एखादी गोष्ट, घटना किंवा प्रतिसाद जेव्हां तुमच्या समोर येतो तेव्हां त्यात काही सकारात्मक असते तर काही नकारात्मक असते. पण त्यातील नकारात्मक तुमच्या झटकन लक्षात येते. खरतर ही गोष्ट चांगली समजली पाहिजे. लूपहोल्स मिटवायला याचा खूप उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं ते यासाठीच. पण काहीवेळेस तुमच्या या स्वभावाचा अतिरेकही होतो. तुमच्या या स्वभावात तुमच्या राजकीय मतांची भर पडलीय. त्यामुळे तर आणखीच गंमत येतीय. निंदा कोणालाच आवडत नाही. त्यामुळेच तुमच्या प्रतिसादांमुळे मिपावर संतोषी होणारे खूप कमी असावेत या शक्यतेनुसार असंतोष हा शब्द वापरला. हा धागा, धागाकर्त्याने भारताबद्दल काही तरी सकारात्मक वाचायला मिळावे यासाठी काढला असावा असा माझा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी मराठी माध्यमातून बर्‍याच वेळेस जे वाचायला मिळत नाही किंवा खूप उशीराने वाचायला मिळते ते येथे लवकर वाचायला मिळू शकेल या हेतूने सभासद इथे येत असावेत असे मला वाटते. त्यामुळे तुमचे प्रतिसाद लोकांना फारच खटकत असावेत, कारण प्रयत्न करूनही त्यात कोणतीही आंतरराष्ट्रीय घडामोड सापडत नाही. सकारात्मकता सापडत नाही. त्यामुळे तुम्हालां "मिपावरील असंतोषाचे जनक" अशी उपमा दिली. पण मला काही तुमचा त्रास नाही. मी तुमचे प्रतिसाद शांतपणे वाचू शकतो किंवा टाळू शकतो. असो.

In reply to by शाम भागवत

पण माझ्या लक्षात आले नाही ते दाखवून दिल्या बद्द्ल आभार.येथून पुढे काळजी घेतली जाईल.

फेसबुकवर, ट्विटरवर एखाद्याला ब्लॉक केले की आपल्या पोस्ट त्याला दिसत नाहीत व त्याच्या पोस्ट आपल्याला दिसत नाहीत. असे काहीतरी मिपावर करण्याची सुविधा हवी.

बाकी मुद्धये चुकीचे आहेत असे वाटत नाही. मेडिकल कॉलेज लोकसंख्येचे मानाने कमी आहेत. अतिशय हुशार मुलांना पण मेडिकल ला प्रवेश मिळत नाही.परत प्रतेक राज्यात अतिशय व्यस्त प्रमाण आहे. खासगी कॉलेज ची फी प्रचंड असल्या मुळे प्रवेश नाही. सरकारी कॉलेज कमी असल्या मुळे तिकडे प्रवेश नाही. आयआयटी ची संख्या पण कमी आहे. आणि प्रवेश परीक्षा ची तयारी करणाऱ्या क्लास ची फीस लाखो रुपये आहे. सरकार नी ह्याला प्राध्यान्य दिले पाहिजे होते. देशातील बुद्धिमान मुलांना संधी मिळत नाही. ह्या समस्या चुकीच्या आहेत असे वाटत असेल तर माझ्या पोस्ट वर टीका जरूर करावी.

In reply to by Rajesh188

एक सांगा ना इतकी स्पर्धा आहे मग त्यातून निवड होऊन कमी हुशार डॉ बनत असतील हा तर्क कसा लावला तुम्ही. बाकी डॉ ची संख्या लोकसंख्येच्या मनाने कमी आहे मान्य. कॉलेज कमी आहेत हे पण मान्य. एकतर मेहनत करण्याची तयारी हवी (बुद्धिमत्ता) किंवा बापाकडे चिक्कार पैसा हवा.

In reply to by गुल्लू दादा

ज्या मुलांची मेडिकल चा अभ्यासक्रम सहज पूर्ण करण्याची उत्तम कुवत आहे अशा लाखो मुलांना संधीच मिळत नाही. आणि ह्या मुलांमध्ये च उत्तम डॉक्टर आहेत आपण ते गमावत आहोत हा पॉइंट आहे.

In reply to by Rajesh188

ह्या मुलांमध्ये च उत्तम डॉक्टर आहेत आपण ते गमावत आहोत
तुमचा पॉइंट बरोबर धरला तर मी पण अशा लाखो मुलांपैकि एक आहे असे समजा. माझी डिग्री विचारणार नसलात तर तुमच्या आजाराबाबत खात्रिने सांगु शकतो २०२९ पर्यन्त तो बरा होण्यची शक्यता नाही. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत तो आणखिन बळावेल. जुन महिना तुमच्यासाठी अधिक धोकादयक ठरु शकतो त्या महिन्यात जास्त काळजी घ्यावी लागेल. तोपर्यन्त शक्यतो आराम करा आणि चा॑गला नसला तरी डॉक्टर कडुनच औषध घ्या, कंपाउंडर कडुन घेउ नका. अन्यथा असे म्हणावे लागेल-आपको दवा की नहि दुवा कि जरुरत है| एका डिग्री मिळवण्या पासुन वंचित राहिलेल्या उत्तम डॉक्टरचा सल्ला तुम्ही ऐकाल अशी आशा ठेवतो.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

काही उपयोग होणार नाही. हि केस हाताबाहेर गेलेली आहे. त्यांना ignore मारणे आपल्या प्रक्रुतिसाठी चांगले.

In reply to by Rajesh188

पुन्हा विषयाशी संबंधित नसलेला प्रतिसाद देउन दुसरी चुक केलीत. तुम्हाला काहि दिवस आरामाची सक्त गरज आहे.

तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या कंपणीने भारतातील ओप्टीएमुस एलेक्ट्रोनिक्स या कंपणीबरोबर भारतात मोबाइल व ईतर संगणकाचे सुटे भाग बनवण्यासाठी करार केला आहे. यात दोन्ही कंपण्या भारतात स्मार्ट फोन बनवण्यासाठी जोईंट हब स्थापित करणार आहेत. या करारानुसार विस्ट्रोन पुढील ३ ते ५ वर्षात भारतात २०० मिलियन डॉलर ची गुंतवणुक करणार आहे. https://www.livemint.com/technology/tech-news/make-in-india-iphone-supp…