फटाकेमुक्त दिवाळी अगदी लहान वयातच आत्मसात केली आहे. मुलालाही लहानपणापासूनच फटाके आवडत नाही.
मात्र देशात वितंडवाद वाढेल म्हणून कृपया राममंदिराचा विषय सोडून द्या / राम खरोखरच होता का ? होता तर देव होता का ? असले उपदेश कोणी करु नका प्लीज. त्यांना योग्य जागी फाट्यावर मारले जाईल.
राम १४ वर्षे वनवास भोगून परत आला तेव्हा दिवाळी साजरी केली जाते असे म्हणतात. आता दिवाळी संपली मात्र राममंदिराचा निकाल येणार आहे. तो संदर्भ पकडून विचारवंत कोठेही उपदेशामृत पाजू शकतात म्हणून हे क नेक्शन.
वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार मुंबईतील दिवाळी ही गेल्या १५ वर्षातील सर्वात शांत दिवाळी होती. तुमच्या शहराचे आकडे काय सांगताहेत ?
या धाग्याला आता ७ वर्शे झाली. यावरील प्रतिक्रियांचे आता पुनरावलोकन करा.कालसुसंगत होताना काहींना अतिशय त्रास झाला असेल. सगळेच लोक आपली सनातन मानसिकता वेगाने कशी बदलू शकतील हा प्रश्नही तितकाच रास्त आहे. सनातन प्रभात ने देखील सुरवातीपासून फटाक्यांना आपला विरोध दर्शवला आहे. कारण फटाके हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. कारण काही असो पण अंनिस व सनातन वाले यांचे यावर एकमत आहे.
कोविडमुळे प्राणवायुचे महत्व या दीड दोन वर्षात लोकांना कळले असूनही वायु व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवले जातात? असा प्रश्न एका सहकार्याने विचारला आहे. गोष्ट खरी आहे. पर्यावरणाला निर्विवादपणे घातक असणारी गोष्ट आपल्याला समजत असूनही सुसंस्कृत समजणारे सुद्धा लोक फटाके का वाजवतात. प्राणवायुविना तडफडणारे मृत्यु आपण या काळात पाहिले आहेत, वाचले आहेत, ऐकले आहेत. आमच्या गृहसंकुलात देखील फटाके लक्ष्मीपूजनाला भरपुर उडवले. प्रबोधनाच्या तुलनेत फटाके उडवण्याची उर्मी ही जास्त असावी. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही.
जग्गी वासुदेव यांनी फटाक्यांवर सरसकट बंदी असू नये असे प्रतिपादन केले आहे. मुलांपासून त्यांचा आनंद हिरावून घऊ नका. मुलांना दिवाळीत फटाके वाजवू द्या. त्या बदल्यात पालकांनी दोन-तीन दिवस ऑफीस ला जाताना वाहनांचा वापर करु नये आणि प्रदुषण टाळावे असे सांगीतले आहे. या बाबतीत आपले काय मत आहे ?
जास्तीत जास्त प्रबोधन वारंवार करुन हे प्रमाण हळू हळू कमी करता येईल. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही. पण सुसंस्कृत लोक सुद्धा उडवताना दिसतात हे पाहून आश्चर्य वाटते हे मात्र खरे. असे का ? याचे विश्लेषण समाजमानसशास्त्रज्ञ चांगले करु शकतील
फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे खरे नाही. ते कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल उदा. फटाके नको विमाने उडवा हा उपक्रम पुण्यात स्वप्नशिल्प सोसायटीत राबवला आहे. बातमी https://policenama.com/pune-news-dont-firecrackers-fly-planes-a-unique-initiative-of-the-swapnashilp-society-kothrud-pune/
एक ठराविक धर्मातील चाली रितींवरच सतत हल्ले करून प्रबोधनाचा जो खोटा आव इतकी वर्षे आणला जात होता तो आता उघड पडत आहे.
त्यामुळे डबल ग्रॅज्युअट असून सुद्धा यावेळेला:
1. तब्येतीला हानिकारक असला तरी भरपूर तेलकट फराळ बनवला आणि खाल्ला.
2. देवाला काहीही नको असले तरी मंदिरात जाऊन देणगी आणि अभिषेक केला.
3. माती खणून काढल्यामुळे वनस्पती आणि सरपटणाऱ्या प्राणी चे नुकसान झाले तरी मोठ्ठा किल्ला केला.
4. आणि भरपूर फटाके आणले आणि उडवले.
खालील लेखन कायप्पावर आले. ते वाचून हतबुद्ध झालो.
----------------------------------
आपले ते पुर्वज ज्यांना रीतसर अग्नी मिळाला नाही - त्यांना तो मिळावा म्हणुन अश्विन अमावास्येला “उल्कादान” नावाचा विधी करतात. काठीवर / लाकडावर / एखाद्या यष्टीवर ज्वालाग्राही पदार्थाचे (जसे तेल, कापूर, लाख, तूप इत्यादी) लेपन करून तो सामंत्रित पेटवतात. आणि पेटून निखारे वर जाणाऱ्या त्या जळत्या काठी/काठ्यांना मंत्र म्हणतांना पुरोहितास दान करतात. या प्रकाशाद्वारे आपण आपल्या अश्या पूर्वजांना मार्ग दाखवतो - ही मान्यता आहे.
अश्विन अमावास्या = लक्ष्मीपूजन = दिवाळी
फुलबाज्या, पाऊस, रॅाकेट वगैरे आगीला “वर” घेऊन जाणाऱ्या गोष्टी या उल्काच आहेत. या तिथीला (दिवाळीला) अग्नी पेटवून आपण आपल्याच पूर्वजांना अग्नी देत असतो. तस्मात् दिवाळीत फटाके (विशेषत: प्रकाशाचे) आवर्जुन फोडावेत. आपण दिवाळीलाच फटाके का फोडतो, दसऱ्याला किंवा राखीपौर्णिमेला का नाही - याचे पण हेच उत्तर आहे.
उल्कादानातील उल्का ही प्रकाशासाठी असते. आम्ही प्रकाशाचे फटाके पितरांना सद्गतीचा मार्ग दाखवण्यासाठी पेटवत असतो. सुतळीबॅाम्ब आम्ही आधी मजा म्हणुन फोडायचो. ते फोडणे कमी केले होते. पण मध्यंतरी फुरोगामी लय माजले आहेत - तर आता आम्ही आवाजी फटाके त्या कारणास्तव फोडतो.आवाजी फटाक्यांचा धर्माशी संबंध नाही - फुरोगाम्यांची जाळणे - हा एकमात्र उद्देश.
---------------------------
यावर मी दिलेले उत्तर -
"चमनचिडी, नागगोळी वगैरे सुद्धा उल्काच असतात का? रॉकेट, फुलबाज्या वगैरे पेटविताना मंत्र म्हणून पुरोहितांना दान दिले नाही तर पूवजांना अग्नी कसा मिळणार?
मुळात माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचे सर्व विधी मला निरर्थक वाटतात. पार्थिव दहनापूर्वीचे विधी, दहावा-तेराव्या दिवसाचे विधी, कावळा शिवणे, वर्षश्राद्ध यात मला स्वत:ला काहीही अर्थ वाटत नाही. मृतदेहाचे शक्य तितके चांगले अवयव नातेवाईकांनी दान करून मृतदेह नंतर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावा असे मला वाटते."
------------------------------
भरपूर फटाके उडवा, फटाक्यांपेक्षा जास्त प्रदूषण वाहनांमुळे होते . . . असे सांगणारे संदेश यावर्षी कायप्पावर येत आहेत.
फटाके वाजवा असे आवाहन करणाऱ्या संदेशांना मी कायप्पावर दिलेले उत्तर -
------------------------------
- फटाक्यांमुळे अतिप्रचंड हवाप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होते.
- प्रचंड कचरा निर्माण होतो.
- फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान होते.
- फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत अनेकांचे प्राण जातात.
- फटाके बालकामगारांकडून बनवून घेतात. वीज, पंखा नसलेल्या अत्यंत भीषण परिस्थितीत ही मुले काम करतात. यातून मुलांना लहान वयातच श्वसनाचे रोग जडतात. फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून काम करणाऱ्या अनेक मुलांचे प्राण जातात.
फटाके हा सर्व दृष्टीने अत्यंत घातक व उपद्रवी प्रकार आहे. फटाक्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका आणि पर्यावरणहानी, वित्तहानी व मनुष्यहानी थांबवा.
यावेळी अनेक वर्षांनी मी फटाके वाजवले ! माझ्या लेकीने फटाक्यांसाठी माझ्याकडे आग्रह धरला, मग मी तिला म्हंटले की बघ मी तुला २ पर्याय देतो. इतक्या रुपयाची मिठाई किंवा त्याच किंमतीचे फटाके, तुला कोणता पर्याय हवा ? माझ्या या प्रश्नाला तिने, बाबा तुम्ही तुमच्या लहानपणी फटाके वाजवले नाहीत का ? असा प्रतीप्रश्न करुन मला क्षणात निरुत्तर केले ! :)
मी फटाके घेतले पण त्यात एक चालाखी केली, २ बॉक्स सुतळी बाँम्ब घेतले [ माझे प्रिय ] आणि पहिला सुतळी बॉम्ब तिलाच पेटायला लावला. :) मोठ्ठा आवाज झाला आणि कंपने निर्माण झाली की आजुबाजुला पार्क केलेल्या गाड्या ट्याव ट्याव आवाज करु लागल्या. तिने या आवाजाची दहशत घेतली आणि बाकीचे बॉम्ब उडवण्यास नकार दिला. मग संध्याकाळी तिला, पाऊस आणि जमीनचक्र फुलबाज्या इ. दिले. याच बरोबर काही आपटीबार देखील दिले. हे मात्र तिला आवडले, आवाजाची दहशत बसल्यानेच पुढच्यावेळी फटाक्याची मागणी कमी होते का ? ते आता पहायचे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।
प्रतिक्रिया
या निमित्त आपल्यात काय काय बदल झाले याच आत्मपरिक्शन करता येईल.
राममंदीराचे कनेक्शन इथे कसे
राम १४ वर्षे
या वर्षी कोरोनाचे सावट
कोविडमुळे प्राणवायुचे महत्व खरेच कळले आहे का?
जग्गी वासुदेव
जास्तीत जास्त प्रबोधन वारंवार
फटाक्यामुळेच मुलांना आनंद
एक ठराविक धर्मातील चाली
खालील लेखन कायप्पावर आले. ते
फटाके वाजवा असे आवाहन
यावेळी अनेक वर्षांनी मी फटाके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।Pagination