Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले. "काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?" "सॉरी चुकले. घरुन फोन आलेला की त्वरित घरी ये…" "इथं लगोपाठ ट्रेन असतात. दुसरी मिळाली नसती का?" ती ओशाळली, आतमध्ये सरकली. तो सांताक्रुझला उतरला आणि खिसे चाचपडु लागला. मागोमाग ती. "काय झालं?" "शट! मगाचच्या गडबडीत आईने मुलीकडच्यांचा एक पत्ता दिलेला तो कागदच उडुन गेला. मी सांताक्रुझचीच, पत्ता सांगाल?. "साफल्यनगर" "समोरचीच कॉलनी, मी तिथेच राहते. कोणाकडे आलात?." "काहीतरी वासंती काटदरे नाव होते, फ्लॅट ११०५ की १११५ आठवत नाहीये. "हम्म" "काय झालं?" "मी दमयंती काटदरे, तुमचं माहित नाही पण मला तुम्ही पसंद आहात."
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मला तुम्ही पसं आहात.
पसं असा शब्द वापरयचा असावा असा कयास आहे.

"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले. "काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?" म्हणजे त्या मुलीने ट्रेन तर पकडलीच होती मग पुन्हा फुटबोर्डावर पाय ठेवण्याचा सल्ला कशासाठी ?

सौंदर्य तुम्ही अमेरिकेत राहता म्हणून तिथे यात्रिक दरवाजा असल्याने कोणी चलती ट्रेन पकडत नाहीतमुबंईत हे रोजचं जीवन आहे. चालू ट्रेन मध्ये नुसता मधला दांडा पकडून किंवा हॅन्डल पकडून दोन चार पावले धावत चढतात. मधलं अंतर जास्त असलं तर त्या खाचेत माणूस फसू शकतो. खलील लिंकवर १.२६ च्या पुढे पहा. https://youtu.be/avoCvYEBpN4

तुमचं माहित नाही पण मला तुम्ही पसंद आहात.
बाकी ट्रेन , चिठ्ठी ,योगायोग जाऊदेत पण आपली पसंती थेट आणि स्पष्टपणे सांगणार्‍या नायिकेकरिता +१

आपली पसंती थेट आणि स्पष्टपणे सांगणार्‍या नायिकेकरिता +१ होय +१

डिडिएलजे, चेन्नै एक्स्प्रेस, पुणेमुंबईपुणे सिम्रन, मीन्नम्मा, गौरी राज, राहूल, गौतम