Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
गावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली. कोवळा मृतदेह पाहून डाॅक्टरना वाईट वाटले. “पोहता येत नाही तर खोल तलावात गेलाच का?” पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं. “कंपनीचं प्रोडक्ट विकून तुम्ही सप्लाय चेन चा एक भाग होनार, नंतर ज्याला प्रोडक्ट विकलंय त्याने पुढे विकलं की तुम्हाला त्यातले “क्षक्ष” टक्के मिळनार, हा पहा अजय ह्याने शिकत हे केलं नी आज त्याच्या अकाऊंटला ५ लाखांचा बॅलन्स आहे.” “मी कर्जाने पैसे घेऊन हे प्रोडक्ट घेनार नी लोकांना विकून थोडे कमावेन, तेवढंच शिकता शिकता घराला हातभार.” “आणी ईतके पैसे परत नाही फेडले गेले तर??”
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

+0.5 लिहता नीट आली नाहीय पण कथाबीज चांगले आहे.

वेगवेगळ्या कंपन्या लोकांना भुलथापा मारून त्यांचे मेम्बर करतात त्यांना प्रॉडक्ट विकतात. हे प्रॉडक्ट त्या व्यक्तीने आणखी तीन/पाच जणांना विकून त्यांना मेम्बर बनवून ही चेन पुढे वाढवायची. ह्यात सामील होणाऱ्या प्रत्येक नव्या मेंबरामागे अमुक एक कमिशन मिळणार वगैरे गाजर बांधले जाते. बहुतेक वेळा ह्यात फसगत होते, घेतलेले प्रॉडक्ट विकू शकत नाही व तो सर्व खर्च गळ्यात पडतो. जर ते प्रॉडक्ट विकत घ्यायला कर्जाने पैसे घेतले असतील तर मग फारच वाईट परिस्थिती होते. वरील कथा बहुतेक करून ह्याच अनुषंगाने लिहिली असावी.. जाता जाता - ही कथा मी लिहिली नाही, कृपया गैरसमज नसावा.

कथाबीज चांगले आहे, अजून चांगली लिहिता आली असती.

+०.९ १०० शब्दातच अजून चांगली करता आली असती, असं वाटतंय. असो. पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं. >> त्यावर एक ब्लेझरपण असतं. असल्या सरांना पोकल बांबूने फोकलून काढायची लै इच्छा होते. काही वर्षांपूर्वी बरेच नातेवाइक असल्या वेगवेगळ्या योजना घेऊन घरी यायचे. आमचे 'सर' येऊन समजावतील, असे सांगायचे.