सरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच.
पण म्हाताऱ्याचा फोनवरचा अविर्भाव आज वेगळाच होता. चढ्या आवाजात प्रश्न विचारत होता, पोलिसांत तक्रार करणार म्हणत होता. सगळं मुसळ केरात ! त्याने फणकाऱ्याने फोन ठेवला.
संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर तो सटपटला- आणि दगाफटका झाल्याचे दुःख झाले.
त्याने खोलीत जाऊन 'शोले'चे पोस्टर रागाने फाडले. काय कलियुग आहे, च्यामारी एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
+१
कोणी उलगडून सांगेल का?
नाही समजली.
रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप
डॉयलॉक शोले मधला असावा
+१
+१
बरोबर.
बरोबर.
केबीसी नसावं
कृपया कथा ऊलगडून सांगावी.
डायरेक्ट बच्चनला फोन कसा काय
मला समजलेला अर्थ - ज्या
:)