Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं. मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार” शंकररावांना धक्का बसला त्यांनी लहान मूलीकडे पाहीलं, “पप्पा, मी देखील लेस्बियन आहे, मलाही मूली आवडतात.” शंकरराव कोसळलेच. संताप, तडफड, अनेक भावना एकाच वेळी ऊचंबळून आल्या. “ह्या घरात मूलगा कुणालाच आवडत नाही का?” ते संतापात ओरडले. “पप्पा, मला आवडतात”… :चिरंजीव ऊद्गारले.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

शीर्षकात "शशक २०२२"असे शब्द वगळले गेले आहे. तसेच कथा "स्पर्धा" विभागात प्रसिद्ध न होता "जनातलं, मनातलं" मध्ये प्रसिद्ध झालीये.

असू दे शंकरराव, तसा बॅलन्स बरोबर आहे फक्त एक सून जास्त येणार ;)

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली. काॅमी भाई गोळाबेरीज मस्त. कथा मस्त प्रतीसाद चुस्त.

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली. काॅमी भाई गोळाबेरीज मस्त. कथा मस्त प्रतीसाद चुस्त.

आरारा .... सगळीच मुलं अशी अल्पसंख्यांक ? बाबो, कसं व्हायचं शंकररावांचं ?http://misalpav.com/sites/all/modules/bueditor/icons/x1.png +१

+ १. आवडली. एका मित्राच्या मुलाने जातीबाहेर लग्न केले. मित्र म्हणाला मुलीशीच केले हे नशीब.

माफ करा पण जोक म्हणून हा संवाद साधारण १० वर्षांपासून वेगवेगळ्या इंग्रजी साईट्सवर अनेकदा वाचलेला आहे. अजूनही अनेक फेबुग्रुप्सवर असेल. कोणीही आधी वाचलेला नाही याचे आश्चर्य वाटले. -१

मी वर दिलेला समांतर शेवट हा पण असाच एक जोक म्हणून वाचला होता. पूर्वी ह्याबद्दलची फारशी माहिती नसताना हसू येत असे, पण आता नाही.