Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला. दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला. आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत. त्याच्या अचानक येण्याने तारांबळ उडली होती.तोडंच्या टकळी बरोबरच तीने पाट रांगोळी करत ताट वाढायला घेतल॔. आपल्याच नादात म्हणाली, आहो हात पाय धुऊन घ्या. तो गेला. . . . . . . मुलगा तीला हालवत म्हणाला, "ए आये,दारावरची घंटी वाजतीय". डोळे चोळतच तीने दरवाजा उघडला,बघते तर काय ? दोन अनोळखी फौजी उभे होते. मागे वळून बघत धाडकन खाली पडली.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

+१ आवडली कसं म्हणायंच ! तिचा भास आणि त्याचं दुर्दैव. अरेरे !
लेखक: Bhakti वेळ: गुरुवार, 05/12/2022 - 15:19 Permalink

+१ तानाजी सिनेमातल शेवटच 'तिनक तिनक' गाणं आठवलं..असंच आहे..

डोळे चोळतच तीने दरवाजा उघडला,बघते तर काय ? दोन अनोळखी फौजी उभे होते.
आईगं......

नायिकेला झोपेत आपला नवरा घरी आल्याचे स्वप्न पडते. वास्तवात तो वीरगतीस प्राप्त झालेला असतो आणि तोच निरोप घेऊन त्याचे सहकारी दारात आलेले असतात. तीची मुले तीला झोपेतून उठवतात आणि तीला वास्तवाची जाणीव होते.

आज आज या कथेची आठवण होण्याचे कारण म्हणजे प्राईमवरील पंचायत(२) चा आठवा आणि शेवटचा भाग. विधुर असलेल्या उपसरपंचांचा एकुलता एक सैनिक मुलगा हुतात्मा होतो. त्याचे शव गावात आणले जाते. हा सर्व प्रसंग हृदय हेलावून टाकणारा आहे. असे काही बघताना सुद्धा आपल्याला अश्रू अनावर होतात, तर प्रत्यक्षात संबंधितांवर काय कोसळत असेल याची कल्पना येते.

अगदी अगदी. स्पॉयलर होइल म्हणुन जास्त लिहित नाही .. पण तो भाग मी सलग पाहु शकलो नाही. खुप वेळा थांबवत थांबवत पाहीला ... अश्रू अनावर होतात यावर सहमत.