पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू
वाड्यासमोरील मारुतीराया
जामगाव येथील जुनी मंदिरे

वाड्यात प्रवेशासाठी पुन्हा दोन दरवाजे आहेत. त्यातील सध्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर समोरच चंद्राकृती विहीर नजरेत भरते. विहिरीची खोली १५० फूट असून पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था आहे.
शिंदे यांचे वारस जिवाजीराव शिंदे यांनी रयत संस्थेस हा वाडा बक्षीस दिला आहे, त्यामुळे सध्या येथे शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय सुरू असते. वाड्यात शिरताच सल्लामसलतीचा एक छोटेखानी दरबार दिसतो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर सुंदर कोरीव नक्षी पाहायला मिळते. कोपर्यात एक खोली आहे, जेथे महादजी शिंदे यांची तसबीर आहे. समोर वाड्याचा मोठा चौक आहे.
महादजी शिंदे यांची तसबीर
जामगाव वाड्याचा चौक
सोप्यातून असलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाता येते. वरील मजल्यावर आकर्षक नक्षी असलेल्या खिडक्यांचे झरोके आहेत. बांधकामातच बनवलेल्या कुंड्याही छान आहेत. शेवटच्या मजल्यावरून सभोवतालचा आकर्षक परिसर नजरेत भरतो.
जामगाव वाडा बांधकामातील कुंडी

वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या २०० मीटर पुढे पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. हेमाडपंथी व इतर दगडी बांधकाम असलेली गणपती व इतर देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्ती विशेष घडवल्या आहेत.
रामेश्वर मंदिर शिखर
मंदिरांच्या दाराखाली विविध कीर्तिमुख आहेत. चाफ्याच्या झाडाखाली निवांत दोन क्षण अद्भुत आनंद वाटला.
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (१)
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (२)

पळशी नगरकोट - पळशी वाडा आणि विठ्ठल राही रखुमाबाई पुरातन मंदिर
पळशी हे गावदेखील दगडी तटबंदी असलेल्या नगरकोटात वसलेले आहे. याला प्रवेशासाठी चार वेशी (दोन छोट्या व दोन मोठ्या) असून सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या आत तीन जुने वाडे आहेत, त्यातील एक वाडा चांगल्या स्थितीत आहे आणि एक वाडा - पळशीकरांचा वाडा काष्ठशिल्पासाठी परिचित आहे. होळकरांचे दिवाण असलेल्या कांबळे-कुलकर्णी यांनी वाड्याची निर्मिती केली, असे समजले. मूळ मालक सध्या इंदूरला वास्तव्यास आहेत. एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते.
प्रवेश करतानाच लाकडी कोरीव काम असलेल्या दरवाजा दिसतो. वाड्यात आत गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत. अंबारीसह हत्ती, मर्कट, ड्रॅगनसम शिल्प, लाकडी कोरीव मनुष्य मूर्ती, फुलांच्या परड्या अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी आनंद देतात. समोरच्या चौकात जुने भुयारी मार्ग बुजवण्यासाठी दगडी परात, जाते बसवलेले आहेत.
कोपर्यातच जुने पारंपरिक मंदिर आहे. मंदिराचे दार आणि पुढील आतील कोरीव छत त्या काळातील लाकडी फॉल्स सीलिंगच म्हणावे लागेल. दुसर्या मजल्यावर राण्यांच्या महाल, रंगमहालसदृश महाल होता. तो आता ढासळला आहे.
दगडी परात
अशा प्रकारे अप्रतिम काष्ठशिल्प पाहून पुढे जवळचेच 'प्रतिपंढरपूर' समजले जाणारे राही राखुमाबाईसह असणारे मंदिर पाहायला गेलो. उंचच उंच प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे, ज्यावर जाण्यासाठी आतील बाजूने जिन्याची सोय आहे. मंदिराचे शिखर दोन भागांत आहे. समोरील मंडपाचे घुमटाकार आणि गर्भगृहाचे उंच शिखर आहे.
मंदिरामध्ये गोपाळ विठ्ठलरूपातील मूर्ती आहे, कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी धेनू, गोवत्सल आहेत. मूर्तीच्या बाजूला दशावतार रेखलेले आहेत. विठ्ठलाच्या एका बाजूला रुक्मिणीची आणि एका बाजूला राहीची अशा मूर्ती आहेत. चौथाराच्या खालील बाजूस वाद्ये वाजवणारे लोक घडवले आहेत.
मंदिराच्या आतील भिंतीवर राधा-बासरीधारक कृष्ण, राम-सीता-लक्ष्मण, गणेश-ऋद्धिसिद्धी, ६४ योगिनी अशा अनेक सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोराच्या अनेक छटा, युद्धातील दृश्ये, व्याल, गजयुद्ध कोरीव काम आहे. महिषासुरमर्दिनीची व इतरही २ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर सुंदर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
मंदिरामागे पाण्याचा प्रवाह आहे. त्यापलीकडे शंकराचे आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला आधुनिक रंगरंगोटी केली आहे तीही उठून दिसत आहे.
पळशीचा गणपती
पावसाळ्याचे दिवस, श्रावणाची हिरवाई, पाण्याच्या प्रवाहाचा मनमधुर खळखळाट... हे दृश्य नेत्रांत मनसोक्त सामावून एक सुंदर दिवस भटकंती घडली.
- भक्ती
प्रतिक्रिया
वा !
वाडे आवडले.
वाह!
+१
पुन्हा एकदा +१
छान आहे लेख.
उत्तम लेख
मस्त
सुंदर!!
:)
:)
बादलीयादीत
बादलीयादीत भटकंती
❤
लेख आणि प्रचि आवडले.❤
या लेखा मुळे ही दोन्ही स्थाने बादलीयादीत टाकत आहे !दगडावरील असो कि लाकडावरील, कोरीवकाम हा
एखाद्या लहानश्या दगडाचे
हा सर्व परिसरच छान आणि
नक्की मिपाकर या ठिकाणी नक्कीच
काष्ठशिल्पातील शेवटचे दार व
फोटो माहिती दोन्ही उत्तम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasaraदोन्ही
हा होळकरांचे दिवाण अन्याबा
बहुधा रामजी यादव पळशीकर,
+१
सरदार चंद्रचूड
बरोबर आहे. नेवासा येथील
लेख आवडला ...
जेम्सदादा उत्तम नवीन माहिती!
खूप छान लेख आणि छायाचित्रे.
लाकडी कोरीवकाम उच्च दर्जाचे
छान
मी दोन तीनदा रविवारीच गेले
चित्रे आणि माहिती आवडली.
चित्रे आणि माहिती आवडली.
वेगळ्याच जागेची भटकंती
छान.
लाकडी कोरीव काम किती मन लाऊन
सर्व शिल्पे खूपच सुंदर..!
खूप छान माहिती आणि फोटो.
> दुसर्या मजल्यावर
मला वरच्या शेवटच्या मजल्याला
पारनेर ला एकदा जावं लागतंय मग