Welcome to misalpav.com
लेखक: तुषार काळभोर | प्रसिद्ध:
नमस्कार! तर महत्वाचा विषय म्हणजे विषय काय असावा.??? तर कळवा आपली मतं. लौकरात लौकर आपण विषय ठरवू कामाला लागुया.... तारीख पे तारिख व्ह्यायला नको, म्हणुन... लक्ष्मी-पुजन शनिवार २४ ऑटोबर हे लक्षात घेवुन पुढच्या तारखा सुचवतो (एक अंदाज). काहि बदल करायचा असल्यास सुचवा ∴ अंक प्रकाशनः (ऑनलाईन) २२ ऑटोबर ∴ लेख देण्याची शेवटची तारीख - १० ऑटोबर ∴ जाहीर आवाहन करण्याची तारीख - ५ सप्टेंबर टीम्स यावर्षी मोर्चा बुवा सांभाळतील. दिवाळी अंकात सासंबरोबर दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात. कोणी संपर्क केल्यास त्यांना इथे घेवु दिवाळी अंकाचे काम नेहमिप्रमाणे विशेषांक चावडी मधे होइल म्हणजे १) आलेले लेख विशेषांक चावडीत प्रकाशित करणे २) लेखकाला पोच देणे ३) लेख अंकात घ्यायचा कि नाहि यावर मत ४) स्विकृती अ-स्विकृती कळवणे ५) मु शो (नूलकरकाका ) ६) सजावट (CSS , चित्र ......) (टर्मिनेटर) ७) अंकासाठी लेख तयार करणे. ( प्रतिक्रिया हटवून प्रकाशित करणे) ८) अनुक्रमणिका ९) मुखपृष्ठ (वा ग बोंद्रे) १०) अंकाची जाहिरात (मिपावर आणि मिपाबाह्य ठिकाणी) काही तांत्रिक अडचण आल्यास नीलकांत आणि प्रशांत आहेच चला लवकर टिम बनवु या.. बोला कोण पयला... ----------------------------------------------------------------------------------- चला चर्चा करूयात.. १. लक्ष्मीपूजन = २४ ऑक्टोबर २०२२ २. विषय असावा का/कोणता असावा? ३. जबाबदार्‍या - कोण कोण स्वतःहून काय काय करणार? राहिलेल्या गोष्टी कोण कोण करणार? ४. अंदाजे टाइमलाइन - (यात कमी जास्त सुचवा) ३१ ऑगस्ट - श्रीगणेशलेखमालेसोबत दिवाळी अंकाचे आवाहन दीड महिना लेख येण्यासाठी १५ ऑक्टोबर लेख देण्याची अंतिम मुदत. ५. लेखकांना व्यनि पाठवून लेखन पाठवण्याची विनंती करणे (मागच्या वर्षी १९२ जणांना व्यनि केला होता) ६. .....
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हे राम.. गवि, तुम्ही यात पडू नका असे सरळ सांगायचे ना.. ह.घ्या ;-)

मला वाटते की पैजारबुवा यांनी संपादकपदाची जबाबदारी घ्यावी. मी, प्राडॉ, तुका यांचे आगोदर हल्लीच झाले आहे. अर्थात मी इतरांच्या वतीने बोलू शकत नाही. सर, तुषार हे संपादक व्हायला तयार असतील तर अत्यंत आनंद आहे. इतर कोणी तयार असेल तरी स्वागत. व्याप असतो. ते पद आधी ठरवावे. मग plan फॉलो करणे सोपे पडते.

मला वाटते की पैजारबुवा यांनी संपादकपदाची जबाबदारी घ्यावी.
काय गवि? ऑफिसबॉयला एकदम चेअरमन करतं का कोणी? पण सिरियसली सविनय नको, कारण अंकाची बाकीची कामे करायला वेळ शिल्लक ठेवायचा आहे. मागच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत हाणामारी चाललेली होती. पैजारबुवा,

संपादकीय लिहिणे. आलेल्या लेखांना दिवाळी अंकात पेष्टवणे. शुद्धलेखन तपासून झाले आहे किंवा नाही ते पाहणे. कोणाचे लेख आले कोणाचे नाही देखरेख करणे. दिवाळी अंक समृद्ध असला पाहिजे. कविता, पाककृती, विनोद, व्यंगचित्र, कथा. असा समृद्ध कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवाहन करणे. बाकी आम्ही आहोतच. या सगळ्याच कामात मदत करायला. -दिलीप बिरुटे

आलेल्या लेखांना दिवाळी अंकात पेष्टवणे. शुद्धलेखन तपासून झाले आहे किंवा नाही ते पाहणे. कोणाचे लेख आले कोणाचे नाही देखरेख करणे. दिवाळी अंक समृद्ध असला पाहिजे. कविता, पाककृती, विनोद, व्यंगचित्र, कथा. असा समृद्ध कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवाहन करणे. >> मग ठिकाय! बुवा अंकल त्यात एक्स्पर्ट आहेत!

ज्ञापै अंकल, व्हा ना चेअरमन . ... शिवाय तुम्ही किती वयोवृद्ध आहात.
वयोवृद्धांच्या यादीत इथली अनेक नावे येतील :D म्हणूनच वरच्या प्रतिसादात Young हा शब्द लिहिता लिहिता टाळला :D उगीच आठ दहा उमेदवार कॅन्सल होऊ नयेत म्हणून... !! :D

१) दिवाळी आवाहन. दि. ........ ड्राफ्ट. २) लेख मागवायचा तो आयडी. व्य.नि. जीमेल. ३) लेखकांना व्य.नि. ( लिहिणा-याची यादी. हा लै वेळ खाऊ कार्यक्रम. याला पास करावा) ४) छापील अंकात लेखन करणारे एक दोन किंवा चार-पाच ( घ्यायचे किंवा नाही निर्णय) ५) टर्मीनेटर यांच्या थीम्स, आयडिया, फाँट, दिवेबत्ती. वगैरे. अजून आठवेल तसं दळन टाकेन. -दिलीप बिरुटे

नमस्कार, दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मिपाचा दिवाळी अंक दि. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी - म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रकाशित होणार आहे. या अंकात आपले लेखन असावं, अशी आमची फार इच्छा आहे. ह्या वेळच्या दिवाळी अंकासाठी तुम्ही काही लिहाल का? लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते लिहा. अंकाला कोणती खास अशी थीम नाही. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. आपलं लेखन साहित्य संपादक या व्यनिवर पाठवा, त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ई मेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी सासं आहेतच. अंकासाठी आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. आपल्या साहित्याची निवड झाली की नाही, ते आम्ही आपल्याला लवकरात लवकर कळवायचा प्रयत्न करूच. काही अपरिहार्य कारणामुळे निवड न झालेलं साहित्य आपण आपल्या मिपा आयडीने स्वतंत्रपणे प्रकाशित करू शकाल. आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत, टीम मिपा दिवाळी अंक

उत्तम मसुदा. या वेळी मला वाटतं आपण ती उदासी, हिंसा नको अशी अपेक्षा काढून टाकूया. कसलीच लिमिट नको व्यक्त होण्यात.

शुक्र २१-वसुबारस किंवा शनि २२ - धनत्रयोदशी ह्या दिवशी दिवाळी अंक प्रकाशित व्हावा असे वाटते. एकदा दिवाळी संपल्यावर वाचकांचा उत्साह झटकन ओसरून जातो आणि वसुबारसेपासून दिवाळी तशी सुरु होत असल्याने ते दोन दिवस उचित वाटतात.

वरचे आवहान हे लेखकांना व्यनि पाठवण्या करता लिहिले होते. दिवाळी अंक धाग्याचे आवहान आता लगेच लिहितो पैजारबुवा,

गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पहाता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच सासंला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे रहाताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -मिपा दिवाळी अंक टीम