Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच साहित्य संपादकांना दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -मिपा दिवाळी अंक टीम
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

@ प्रशांत लेखकाचे नाव तेवढे बदलून घ्यावे लागेल, गडबडीत सासंने लॉगिन करायचे विसरलो. पैजारबुवा,

स्वसंपादित. उत्स्फूर्तता मारणार्या सूचनांचा भडिमार जाणवल्याने हे गुर्हाळ अप्र करतोय. यावर वाचण्यात / प्रतिसाद देण्यात पै बुवा आणि अन्यांनी दिलेला वेळ वाया गेला याचे वाईट वाटतेच. पण इतरांना उगीच काही अति बारीक सारीक सूचना वाचून प्रतिसाद उत्स्फूर्त देणेच अवघड होण्याची शक्यता नको म्हणून हे डिलीट करतोय. जे आहे ते उत्तम चाललेय. __/\__

सुचना क्र "अ" आमलात आणायला नको त्यापेक्षा "ब" आणि "क" वर काम करुया. चर्चा करणे सुचना करणे, सुचना आमलात आणल्या नाही म्हणून भांडणे रुसणे हे मिपावर सुरुच असते . धागा वामा केला तर वेगळ्या ठिकाणी चर्चा होईल, तेव्हा धागा वामा करु नये असे मला वाटते. अर्थात सर्व संमती ने जो निर्णय होईल तो मान्यच असेल. सुचना क्र. "ब" प्रमाणे धाग्यात योग्य तो बदल केला आहे सुचना क्र. "क" आपण सगळे आमलात आणूया. पैजारबुवा,

आपल्या संभाव्य लेखकांच्या यादित ३०० जण आहेत. इतक्या सगळ्यांना व्यनि पाठवायचा का? का या यादिला अजून काही चाळणी लावायची? आणि कोणती? पैजारबुवा,

हा व्यनिचा मसुदा - https://misalpav.com/comment/1151910#comment-1151910 मसुदा जेनेरिक आहे. म्हणजे "तुम्ही याआधी दिवाळी अंकासाठी लेखन पाठवलं आहे", "तुम्ही उत्तमोत्तम लेखन नेहमीच करता" असं स्पेसिफिक काही नसल्याने ते सर्वांना लागू होईल आणि कृत्रिम वाटणार नाही. + बरेच लेखक इमेलवर लेख पाठवतात, त्यांचा मिपा आयडी बनवला जातो, पण ते वापरत असतील असे कधी दिसले नाही. तर त्यांना इमेलवरून कळवायचं का?

मग आजपासुन व्यनि पाठवायला सुरुवात करायची का? पुढचे चार पाच दिवस पुरेल इतके काम आहे, लगेच सुरु करायला हवे. बरेच लेखक इमेलवर लेख पाठवतात, त्यांचा मिपा आयडी बनवला जातो, पण ते वापरत असतील असे कधी दिसले नाही. तर त्यांना इमेलवरून कळवायचं का? कदाचित हे लोक्स वामा असतिल, ते दिवाळी अंक आवहान वाचतिलच की परत व्यनि कशाला करायचा? व्यक्तीगत संपर्क करुन लेख मिळवायचे काम लेखकाशी संपर्कात असलेला साहित्य संपादक करेल उदा रिचर्ड न्युनिस - टर्मिनेटर, सई मांडे - पैजारबुवा, इत्यादी. पैजारबुवा,

गवि सर तुमच्या प्रतिसादातले चिंतन आणि त्या अनुशंगाने केलेल्या सुचना मोठ्या उपयुक्त होत्या. तुम्ही स्वसंपादन करणार आहात हे माहित असते तर मी त्या किमान कुठेतरी साठवुन ठेवल्या असत्या. तुम्हाला विनंती आहे तो प्रतिसाद कृपया पूर्ववत करा, म्हणजे सर्वांना त्यावर आपापली मते मांडता येतिल. पैजारबुवा,