Welcome to misalpav.com
लेखक: MipaPremiYogesh | प्रसिद्ध:
हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्‍या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे. स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2 तारीख - 27 सप्टेंबर 2022 मी साधारण ११ वाजल्यापासून तिकडे उपस्थित असणार आहे. सकाळ पासून तिकडे माहितीपट, व्लॉग दाखवले जाणार आहेत, एका परिसंवाद पण आयोजित केला गेला जाणार आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजे पुरस्कार सोहळा १ ते २ असणार आहे. कृपया ज्यांना जमले त्यांनी अवश्य भेट द्या.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रदर्शन tourism आणि महाराष्ट्रात tourism कसे वाढवता येईल ह्या विषयावर आहे. त्यात मी वारी चा फोटो पाठवला होता तो आहे.

अभिनंदन आणी खुप खुप शुभेच्छा , मिप्रेयो भाऊ ! उद्या वर्किंग दिवस असल्याने भेट देणे अवघडच आहे. वृतांत नक्की टाकावा ही विनंती !