Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
6

दिवाळीतल्या फराळाचा बराच वेळखाऊ प्रकार करंजी! यामध्ये सुके-ओले खोबरे, रवा-पीठ, पंचखाद्य, पिठीसाखर असे अनेक सारण भरता येऊ शकते.

तर करू या रवा आणि खवा सारणाच्या करंज्या. साहित्य पारीसाठी दीड वाटी मैदा एक वाटी रवा दूध मोहनसाठी दोन मोठे चमचे तूप चिमूटभर मीठ करंजीसाठी सारण एक वाटी खवा एक वाटी रवा एक वाटी गूळ एक वाटी पिठीसाखर सुकामेवा पूड तळण्यासाठी तेल
1

कृती करंजीसाठी वरील प्रमाणात मैदा व रवा एकत्र करावा. चिमूटभर मीठ टाकावे. तूप कडकडीत गरम करून मोहन म्हणून घालावे. कोमट दुधात मध्यम सैल पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. सारणासाठी एक वाटी रवा तुपात खमंग भाजावा. बाजूला एक फुलपात्र पाणी उकळावे, त्यात गूळ घालावा. नंतर त्यात रवा टाकावा. भरड भरड रवा होतो. ओलसर नको. खवा लालसर भाजावा. ताटात काढून कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर टाकावी. एकत्र मिश्रण करावे. रवा-गूळ आणि खवा-पिठीसाखर अशी वेगवेगळी सारणे एकत्र करावीत. सुकामेवा पूड टाकावी. पारीसाठी लाट्या बनवण्यासाठी मळलेल्या पिठाची मोठी जाडसर पोळी लाटून त्यात तुपात फेसलेला मैदा यांचे मिश्रण सर्वत्र लावून घ्यावे. गोलाकार रोल करून लाट्या कापून घ्याव्यात. एक एक लाटी लावून सारण भरून फिरकीने करंजीचा आकार द्यावा. गरम तेलामध्ये मंद आचेवर करंज्या तळून घ्याव्यात.
3

शुभ दीपावली!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मस्तच खरं म्हणजे आता चकली, लाडू, चिवडा, शेव याचे तितकं अप्रूप राहिले नाही. हे पदार्थ कायम खाल्ले जातात. आमच्याकडे करंजी मात्र फक्त दिवाळीतच केली जाते. त्यामुळे करंजी हा फराळातला खास आवडीचा पदार्थ. रव्या खव्याची करंजी पहिल्यांदाच पाहिली आणि कृती आणि फोटो बघून ही नक्की आवडणार असे वाटतेय. खायचा योग कधी येतोय बघू.

भारी.. आमच्या कडच्या पेक्षा खुप वेगळी पण छान वाटते. पहिल्यांदा मला करंजी आवडत नसे, पण गेल्या तीन चार वर्षांपासून करंजी खुप्पच आवडते...

माझ्या सोमिवरच्या एकामागच्या एक पाककृती पाहून मैत्रिणी म्हणाल्या तू बोलावते का तुझ्याकडे धाड टाकू :) वैज्ञानिक व्हायची हौस इकडे भागवते !

नेमेचि दिवाळीत फक्त येणार्या नेहमीच्या पदार्थाल वेगळा ट्विस्ट देऊन केलेली खास पाककृती आवडली. खायचा योग केंव्हा ते मात्र बघावे लागेल. प्रत्येक पायरीचे फोटो टाकून मेहनत केलेली दिसते. धन्यवाद.

मस्त रेसीपी.नक्की करणार. लेक येणार आहे तीन वर्षांनी घरी. नवीन काय करायचं हा प्रश्न होता तो मिटला. पण मला जमली पाहिजे तुझ्यासारखी .
लेखक: Bhakti वेळ: गुरुवार, 11/10/2022 - 08:18 Permalink

सर्वांना खुप खुप धन्यवाद!

करंजी हा दिवळीच्या फराळातला अत्यंत आवडता प्रकार! पहिला फोटोच कसला कातिल आहे... आधिच्या संपल्यात, आता आईला अशा प्रकारे परत बनवायला सांगावे लागणार 😀